अामदाबाद ला मळगंगा देवीच्या यात्रोत्सवाचे अायोजन

आमदाबाद , ता.२८ एप्रिल २०१६ (प्रतिनीधी ) : थे शुक्रवार(ता.२९)रोजी मळगंगा देवीची यात्रोत्सवाचे अायोजन केले असल्याची माहिती सरपंच योगेश थोरात यांनी दिली.

याबाबत थोरात यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि,शुक्रवार(ता.२९) रोजी सकाळी ७ते८ या वेळेत मळगंगा देवीस मांडव डहाळे हा कार्यक्रम होणार असुन लगेचच देवीस चोळी पातळ,नैवेद्य,व शेरणी वाटप केले जाणार अाहे.त्याचप्रमाणे दुपारी ३ ते ६ या वेळेत किसनराव साळवे अामदाबदकर सह संगिता पुणेकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम व रात्री छबिना पालखी मिरवणुक होणार अाहे.रात्री अंजनी नाशिककर यांचा लोकनाट्याचा व दुस-या दिवशी शनिवारी(ता.३०) रोजी हजे-यांचा कार्यक्रम होणार अाहे.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे अॅड.रंगनाथ थोरात,नितीनअण्णा थोरात,सरपंच योगेश थोरात,उपसरपंच संदिप जाधव यांनी सांगितले अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या