मांडवगण फराटा येथे बोअरवेलमध्ये चिमुकला पडला

 मांडवगण फराटा ,  ता. ३० एप्रिल २०१६ (सतीश केदारी) : येथील जुना मळा येथे २० फुट बोअरवेलमध्ये सुनील हरिदास मोरे हा  सहा वर्षाचा बालक खेळत असताना या बोअरवेल मध्ये पडल्याची घटना अाज दुपारी साडेबाराच्या सुमारास  घडली अाहे.

शिरुर तालुक्यात या परिसरात बोअरवेल मध्ये लहान बालक पडण्याची ही दुसऱयांदा घक्कादायक घटना घडली अाहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत अाहे. बोअरवेल मधुन मला लवकर बाहेर काढा, अाजी तु कोठे अाहेस.... असा जोरजोराने अावाज बबोअरवेल मध्ये पडलेला सहा वर्षाचा बालक हा देत अाहे.

सविस्तर माहिती अशी कि, राजाराम शितोळे यांच्या शेतामध्ये शेतमजुर म्हणून परगावीवरुन पाटोदा-गरड (ता.जामखेड) येथुन गेले दोन वर्षापासुन शितोळे यांच्याकडे अालेले मोरे कुटुंब शेत मजुर म्हणून शेतीत काम करत अाहेत
.
शनिवारी (ता.३०) रोजी सकाळी अकराच्या सुमारास मुलाची अाजी तुळसाबाई सावळा मोरे या नवनाथ शितोळे यांच्या शेतामध्ये काम करत होत्या. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा नातू सुनील हरिदास मोरे हा अाला होता. दरम्यान, शेजारील असणा-या मोकळ्या शेतामध्ये सुनील मोरे हा अापल्या मित्रासोबत  दुपारच्या साडेबाराच्या सुमारास खेळत होता. त्या ठिकाणी नजीकच बोअरवेलची रात्रीच्या सुमारास  खोदाई करण्यात अाली होती. हा बोअरवेलचा खड्डा मुलाच्या खेळत असताना लक्षात न अाल्याने सुनील हा बोअरवेल मध्ये पडला. परंतु, त्यावेळी त्याच्याच सोबत अालेल्या मित्राला सुनील हा बोअरवेल च्या पडल्याचे लक्षात अाल्याने त्याने वरील प्रकार त्याच्या अाजीला घडलेला सांगितला. अाजीने अोरडण्यास  सुरुवात केली व घडलेला प्रकार मालक राजाराम शितोळे यांना सांगितला. शितोळे यांनी १०० क्रमांकावर संपर्क साधून यंत्रणेस कळविले व तसेच हा प्रकार ग्रामस्थांला सांगितले. ग्रामस्थांनी  मदतीने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी  व गावातील वरदविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मदतीने या बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला  तातडीने अॉक्सिजन  पुरविण्यात अाला. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी  दोन जेसीबी च्या साहाय्याने या ठिकाणी खोदाई सुरु केली.

या घटनेची माहिती समजताच शिरुरचे तहसिलदार राजेंद्र पोळ,नायब तहसिलदार गितांजली गरड,शिवसेनेचे पोपट शेलार,व पोलीसप्रशासन तसेच राजकिय व विविध क्षेत्रातील व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली अाहे. बालकाला बोअरवेल मधुन बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या