...ते स्वप्न अधुरेच राहिले

मांडवगण फराटा ,  ता. २ मे  २०१६ (सतीश केदारी) :"अाम्ही मजुरी जरी केली तरी हे हाल मुलांच्या वाट्याला येउ नये म्हणुन सुनिल ला मोठा अधिकारी बनवायचे स्वप्न होते. परंतु ते स्वप्न देखील अाता अधुरेच  राहिले" असल्याची भावना सुनिल चे वडिल हसिदास व पत्नी यांनी बोलताना व्यक्त केली अाहे.बचावपथकाचे काम सुरु असतानाच सुनिल चे अाई वडील हताशपणे अॅम्ब्युलसजवळ बसले होते.त्या वेळी त्यांनी अापल्या भावना प्रतिनीधी  बोलुन दाखविल्या.

मांडवगण फराटा येथील  जुनामळा येथे तब्बल  ३१ तास  बोअरवेल मध्ये अडकलेल्या सुनिल हरिदास मोरे या चिमुरड्याला बाहेर काढण्यास एनडीअारएफच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु  या चिमुकल्याची प्रकृती खुपच खालावली असल्याने त्याला पुढिल उपचारांसाठी पुण्यात  रुग्णालयात  दाखल करण्यात येत असतानाच सुनिल चा मृत्यु झाल्याने तालुक्यासह राज्यभर हळहळ व्यक्त केली गेली जात अाहे.

कसे सुरु होते बचावपथकाचे काम
शनिवारी(ता.३०)रोजी दुपारी  शेतात खेळत असताना सुनील हा  पाय घसरुन वीस फुट खोल असणा-या बोअरवेल मध्ये पडला होता.या घटनेची माहिती कळताच त्याला सर्व प्रथम स्थानिक डॉक्टरांनी अॉक्सिजन पुरवठा सुरु केला होता.त्यानंतर स्थानिक दोन जेसीबी बोलावुन प्राथमिक खोदाई  काम सुरु केले होते.त्यानंतर पुण्यावरुन अग्निशामक पथक व काहि कालांतराने एनडीअारएफ चे तळेगाव दाभाडे येथील पथक घटनास्थळी दाखल झाले होते.या वेळी तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्या उपस्थितीत खोदकाम सुरु करण्यात अाले होते.हे खोदाई काम सुरु  केले असताना त्या ठिकाणी कठिण खडक लागल्यामुळे हा कठिण खडकाचा भाग फोडत असताना शनिवारी रात्री दोन पोकलेन असताना पुन्हा एका मोठे पोकलेन ला बोलावण्यात अाले.या पोकलेन ला देखील यायला बराच वेळ गेला. दरम्यान अात उतरण्यासाठी खडडा खोदावा लागणार होता. या साठी दोन ब्लास्टिंग ट्रॅक्टर शिरसगाव काटा येथुन मागविण्यात अाले होते.या सर्व यंत्रणेला शनिवारी रात्री या यंत्रणेला तातडीने घटनास्थळी दाखल होण्यास बराच अवधी गेला होता. तर एक ब्रेकर दुरवरुन यायला मध्यरात्र झाली होती.हि यंत्रणा पोहोचताच पुन्हा खोदाई काम सुरु करण्यात अाले .शनिवारी रात्री ते रविवारी दुपारर्यंत खड्डा खोदाई चे काम करण्यात अाले.याहिवेळी वेळी ब्रेकर जास्त खोल जाउ शकत नसल्याने एनडीअारएफ च्या पथकाने त्यांच्या अत्याधुनिक छोट्या मशिन च्या साहाय्याने खडक फोडण्याचा प्रयत्न सुरु केला होता.या वेळी त्या चिमुरड्याच्या जिवितास धोका पोहोचु नये म्हणुन विशेष खबरदारी घेण्यात येत  होती.तर दुस-या दिवशी रविवारी  सकाळी साडे अकरापर्यंत सुनिल बोलण्याचा चांगला प्रयत्न करत होता. त्या बोअरवेल च्या शेजारी पोकलेन च्या साहाय्याने सुमारे २३ फुट उभा खड्डा पोकलेन च्या साहाय्ाने खोदण्यात अाला तर बोअरवेल च्या नजीक छोट्या ब्रेकर च्या साहाय्याने अाडवा सुमारे साडेसहा फुट खड्डा समांतर खोदण्यात अाला.अाडवा खड्डा ब्रेकर च्या साहाय्याने खोदत असताना होणारे कंपन जानवत असल्याचे सुनिल ने सांगताच तत्काळ बचावपथकाने सावध पवित्रा घेत खोदाई सुरु केली होती.यावेळी वारंवार टेप च्या सहाय्याने बोअरवेल चे खोदाई केलेले अंतर मोजले जात होते.अाडवे खोदकाम  करताना या बालकाच्या छातीसमोर दगड गुंतला असल्याचे व या बालकाचे दोन्हि हात अन पाय देखील एकमेकांत गुंतले असल्याचे बचाव पथकाच्या निदर्शनास अाले होते. व बाहेर काढण्याची मोठि अाशा असताना हिच मोठी अडचण निर्माण झाली होती. हि अडचण बचावकार्याच्या पथकाने  लक्षात घेत बालकाच्या शेजारील कठिण खडक फोडुन त्याचे गुंतलेले पाय सर्वप्रथम मोकळे केले तरीदेखील त्याचे हात गुंतलेले असल्याने त्याला कसलीच हालचाल करता येत न्हवती.तोपर्यंत दुपार टळुन गेली होती.सुनिल च्या हालचाली मंद होत असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी धोका पत्करत ताबडतोब धाव घेत अात मध्ये जाउन त्याच्या पायाला सलाईनद्वारे अौषधे देण्याचा प्रयत्न केला.त्यावेळेस त्याची प्रकृती खालावत चालली असल्याचे संबंधित डॉक्टरांच्या निदर्शनास अाले.घटना घडण्यापुर्वी सुनिल ने जेवणदेखील केले नव्हते.त्यामुळे दुपारपासुन बोलण्याचा प्रतिसाद देखील कमी केला होता.तोपर्यंत एनडीअारएफ पथकाने पाय अन कंबर मोकळी केली होती.व सायंकाळी एनडीअारएफ,अग्निशामक दल यांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करत कोणतीहि इजा न होता बाहेर काढले. व सुनिल ला तत्काळ  मांडवगण फराटा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केले व पुढिल उपचारांसाठी हलविले .दरम्यान पुणे येथील रुग्णालयात नेत असतानाच मृत्यु झाला.दरम्यान या बालकाचे ससुन रुग्नालयात अाज सकाळी  शवविच्छेदन करन्यात अाल्यानंतर मृतदेह त्यांच्या गावी पाठविन्यात  अाला.

...तर कदाचित घटना घडली नसती
 ज्या बोअरवेलमध्ये सुनिल पडला होता त्या बोअरवेलला क्रेसिंग पाईप टाकलेला नव्हता असेच निदर्शनास येत होते.तसेच पाईप नसल्याने देखील अात मधुन बाहेर काढण्यास उशिर लागला.जर योग्य ती खबरदारी घेतली असती तर हि घटना घडलीच नसती.

सलाम त्या युवकाला
बोअरवेल मध्ये सुनिल पडल्यानंतर सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत पाटस येथील सचिन अाव्हाळे या तरुणाने संवाद साधला.तर सुनिल देखील सचिन च्या बोलण्याला वारंवार प्रतिसाद देत होता.अखेर चा संवाद देखील याच तरुणाबरोबर झाला होता.या सर्व मोहिमेत येथील डॉ.मंजुषा सातपुते व इतर डॉक्टरांचे पथक सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत अॉक्सिजन पुरविण्याचे काम करत होते.पुणे अग्निशामकचे एकुण ९ जवान, एनडीअारएफ चे २३ जवान कार्यरत होते.

ढिसाळ पोलीस यंत्रणा
 गेल्या दोन दिवसांपासुन चिमुरड्याला वाचविण्यासाठी सर्वच प्रयत्न करत असताना दुसरीकडे बघ्यांची तोबा  गर्दी झाली होती.गर्दिला पांगविताना पोलीसांनी अनेकांना काठ्यांनी मारहाण केली.तर बोटावर मोजता येईल इतकेच अधिकारी हजारोंच्या गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न करत होते.वस्तुस्थिती पाहता घटनास्थळी शासकिय यंत्रणेचा या कामी अत्यंत हलगर्जीपणा दिसुन येत होता.एकिकडे या बालकाला वाचविण्यासाठी धावा केल्या जात होता.तर दुसरीकडे शासकिय अधिका-यांचा हलगर्जीपणा सुरु होता.

सगळ्यांनाच मृत्यु चटका लावुन गेला
सुरुवातीपासुन अनेकांनी घटनास्थळी मदत केली.मांडवगण फराटा ग्रामस्थांनी देखील अनेक सुविधा पुरविल्या परंतु अखेर दु:खद घटना कळताच महिला व अाबालवृद्धांसह अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या