सणसवाडी येथे कामगारांचे विविध मागण्यांसाठी उपोषण

सणसवाडी,  ता.५ मे २०१६ (शिक्रापुर प्रतिनीधी) : सणसवाडी आणि पिंपळे जगताप येथील दोन युनिट मध्ये असलेल्या इनोव्हेंटिव्ह इंडस्ट्रीज लि. कंपनीकडून कामगारांवर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठविण्यासाठी आणि कामगारांच्या मागण्यांसाठी तीनशेहून अधिक कामगार  उपोषणास बसले असून कामगार आयुक्त कार्यालयात  घेण्यात आलेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने कामगारांचे उपोषण अद्याप सुरूच आहे.


सणसवाडी व पिंपळे जगताप येथील इनोव्हेंटिव्ह इंडस्ट्रीज लि. या कंपनीत काम करणाऱ्या ४०० कामगारांनी कंपनी व्यवस्थापकाकडे वेतन वाढीचे मागणीपत्र सादर केल्याने कंपनी व्यवस्थापकाने काही कामगारांच्या जाणीवपूर्वक दिल्ली, चेन्नई, ओसुर, औरंगाबाद अशा ठिकाणी बदल्या केल्या आणि कामगारांचे जीवन उद्वस्थ करण्याच्या हेतूने काही कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केले तर काही कामगारांना २९ जानेवारी २०१६ पासून कामावर येण्यास मनाई केली आहे. तर १०० कामगारांना कामावरून निलंबित केलेले असून गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कामगारांची चौकशी सुरु केली आहे. तसेच डिसेंबर पासून दोन महिन्यांचे वेतन देखील कामगारांना अद्याप दिलेले नाही त्यामुळे कामगारांवर झालेल्या अन्यायामुळे कामगारांचे जीवन धोक्यात आलेले असून इनोव्हेंटिव्ह इंडस्ट्रीज कंपनीकडून कामगारांवर झालेल्या अन्यायाबाबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार सणसवाडी येथील चंद्रमा हॉटेल शेजारी प्राणांतिक उपोषणास बसलेले आहेत. कंपनीने सर्व कामगारांवरील गुन्हे मागे घेऊन,त्यांच्या बदल्या व निलंबन रद्द करून त्यांना कामावर पूर्ववत रुजू करून घ्यावे तसेच रखडलेले वेतन द्यावेत अशा कामगारांच्या मुख्य मागण्या आहेत.

यावेळी कामगार आयुक्तांनी कामगारांचे प्रतिनिधी आणि कंपनी व्यवस्थापक यांची बैठक कामगार आयुक्त पुणे या ठिकाणी बोलावली होती. परंतु त्या बैठकीत फक्त डिसेंबर महिन्याचा पगार देण्याचे व फक्त १५० कामगारांना कामगार घेण्याचे व्यवस्थापकाने मंजूर केले आहे. व ठरलेला पगार देखील काही कामगारांच्या खात्यावर बुधवारी जमा करण्यात आला आहे. परंतु शिल्लक पगार व अन्य कामगारांबाबत व्यवस्थापक काहीही बोलले नसून त्यासाठी लवकर बैठक आयोजित होण्याची शक्यता आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस असून अनेक गावच्या पुढाऱ्यांनी या आंदोलनास भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे.उपोषणाचा चौथा दिवस आणि उन्हाची असलेली तीव्रता यामुळे अनेक उपोषणकर्त्या कामगारांची प्रकृती खालावली असून त्यांची वैद्यकीय तपसणी देखील करण्यात आली अाहे. प्रकृती खालावली असलेल्या कामगारांना त्वरित ससून रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे कामगारांची तपासणी करणारे ग्रामीण रुग्णालय तळेगाव ढमढेरे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु आम्ही कोणीही कामगार या ठिकाणहून हलणार नसल्याचे सांगत कामगारांच्या सर्व मागण्या मान्य होई पर्यंत आंदोलन मागे घेणार नसून उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे देखील यावेळी सर्व कामगारांनी सांगितले आहे.बुधवारी सायंकाळी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी देखील कामगारांची भेट घेतली असून कामगारांचे हित जपण्यासाठी कामगार कायद्यात सुधारणा होणे गरजेचे असल्याचे सांगितले.Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या