निमोणेत वेटरचा निर्घुन खुन;एक गंभीर जखमी

निमोणे ,   ता.५ मे २०१६ (प्रतिनीधी ) : येथील शिवनेरी ढाब्यावर वेटरचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली अाहे.तर या घटनेत एक वेटर गंभीर जखमी झाला अाहे.

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार, निमोणे गावच्या हद्दीत निमोणे-गुनाट या रस्त्यालगत राजेंद्र दशरथ काळे यांचा शिवनेरी हा ढाबा आहे.या ढाब्यावर वेटर म्हणून काम करणारे अनिल सुखदेव पाटुळे (वय-३०) रा. मुळ गांव मंडपगांव ता.जि. जालना व दिगंबर फकिरा साबळे (वय-३५) रा.मुळ गांव हिवरा, ता.सिंदखेड राजा,जि.बुलढाणा हे एकमेकांचे साडु आहेत.हे बुधवार (ता.४) रोजी रात्री  जेवण करून ढाब्यामागील मोकळ्या शेतात झोपले होते.दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कठिण लाकडी दांडक्याने या दोघांवर हल्ला चढवत डोक्यावर प्रहार केले.या हल्ल्यात अनिल सुखदेव  पाटुळे (वय -३०) हा जागीच मरण पावला.तर दिगंबर फकिरा साबळे (वय -३५) हा गंभीर जखमी होवून बेशुद्धावस्थेत पडला.

 साबळे यास (ता.५ मे) रोजी पहाटे ३.००च्या सुमारास शुद्ध आल्यावर पादुळे मयत झाल्याचे समजले. त्याने फोनवर घडलेला प्रकार मालकास कळविला. दरम्यान याच ढाब्यावर काम करणारा छोटु (पुर्ण नांव समजू शकले नाही) नामक वेटर ची स्कूटी गाडी क्र. एम.एच्.१२ जीटी ४०९३ सह गायब असल्याचे समजते. त्यामुळे वेटरमध्येच आपापसांत किरकोळ कारणावरून वाद होऊन हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

ही खबर शिरूर पोलिस स्टेशनला समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक उत्तम भजनावळे,बिट जमादार अविनाश गायकवाड व इतर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला अाहे.या घटनेची माहिती समजताच दौंडचे उपविभागीय पोलिस आधिकारी राजेंद्र मोरे व शिरूरचे पोलिस निरिक्षक भगवानराव निंबाळकर यांनी  घटनास्थळी भेट देउन पाहणी केली.

या प्रकरणी संशयित  आरोपी छोदू यावर गुन्हा दाखल करण्यात आला अाहे या घटनेचा तपास पो.निरिक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या