वाघाळे च्या खो-खो संघाने पटकाविले अजिंक्यपद

वाघाळे ,   ता.६ मे २०१६ (प्रतिनीधी ) : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय निमंञित खो खो स्पर्धेत येथील आपली माती क्रीडा संघाने ७वे जिल्हा अजिंक्यपद पटकावत मुक्ताई चषकावर नाव कोरले अाहे.

नुकत्याच झालेल्या खो खो स्पर्धेत विविध संघांनी भाग घेतला होता.या मध्ये १४ वर्षे मुलांच्या गटात खेळविलेल्या सामन्यांमध्ये पिंपळगाव,ता.खेड येथील शिवाजी स्पोर्टस क्लब ने चौथा क्रमांक,सचिन स्पोर्टस क्लब, गंुजाळवाडी (ता.जुन्नर) यांनी तीसरा तर इंदापुर तालुक्यातील मुक्ताइ स्पोर्टस क्लब ने द्वितीय क्रमांक मिळविला अाहे. 

या वेळी पार पडलेल्या स्पर्धेत आपली माती क्रीडा प्रबोधीनी, वाघाळे या संघाने सर्व सामने डावाच्या फरकाने जिंकत सलग ७वे जिल्हा अजिंक्यपद पटकावत स्पर्धेत आपला दबदबा ठेवला व उपस्थित प्रेषकांची मने जिकंली.

अापली माती च्या खो-खो संघाचे वाघाळे ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात अाले अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या