अखेर "साईकृपा"साखर कारखान्यावर गु्न्हा दाखल

शिरूर ,  ता.६ मे २०१६ (मुकुंद ढोबळे ) :  गेल्या अनेक दिवसांपासुन तालुक्यातील शेतक-यांना पेमेंट देण्याचे अाश्वासन देणा-या साईकृपा साखर कारखाना,हिरडगाव युनिट २ या कारखान्यावर अखेर फसवणुक केल्याप्रकरणी  शिरुर  पोलीस स्टेशन ला गु्न्हा दाखल करण्यात अाला  अाहे.

या प्रकरणी राजकुमार ढमढेरे,शिवाजीराव अनसुले  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला असुन या मध्ये माजी मंत्री बबनदादा  पाचपुते यांच्या मुलगा संचालक विक्रमसिंह पाचपुते यांचा देखील समावेश अाहे.

या संदर्भात पिंपळसुटी येथील शेतकरी अनिल कापरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,सन१/२/२०१५ते १५/०२/२०१५ या कालावधीत त्यांच्या अाई सरुबाइ कापरे यांच्या नावाने हिरडगाव येथील कारखान्यास उस गाळपास दिला होता.परंतु वारंवार कारखान्याकडे मागणी करुन देखील बिल न अदा केल्याने
या साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजकुमार एस.ढमढेरे,संचालक शिवाजीराव अनभुले,संचालक विक्रमसिंह पाचपुते व इतरांविरुद्ध  फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात अाली अाहे.वरील व्यक्तींविरुद्ध तालुक्यातील इतर शेतक-यांची देखील फसवणुक केली असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे.

शिरुर तालुक्यातील शेतक-यांची थकित बिले मिळावीत यासाठी शिवसेनेचे शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली वारंवार अांदोलने छेडण्यात अाली होती .या वेळी योगेश ओव्हाळ,माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी खेडकर, तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या