कारेगाव ला उद्या संयुक्त जयंती महोत्सव

कारेगाव, ता.९ मे २०१६ (प्रतिनीधी) : येथे संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने राष्ट्रपिता म.ज्योतिबा फुले व विश्व रत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव उद्या (ता.१०) मे रोजी संपन्न होणार असल्याची माहिती अध्यक्ष कैलास जगताप यांनी दिली.

कारेगांव ( ता. शिरूर ) येथील संयुक्त उत्सव समितीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोतर रौप्य महोत्सवी जयंती समारंभ मंगळवारीसंपन्न होत आहे. यानिमिताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९.०० वा. ध्वजारोहण व धम्म वंदना, सकाळी १०.०० ते ११.३० वा. महापुरुषांच्या प्रतिमांपूजन व अभिवादन सभा. यावेळी विस्तार अधिकारी डी.के. गायकवाड यांचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान' या विषयावर व्याख्यान होईल. याचवेळी १२५ विदयार्थांना वहया वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० ते १२ .३० वा. विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा व त्यानंतर स्नेहभोजन,सायंकाळी ४.०० वा. महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक व रात्री ८.०० वा खूशी पाटील प्रस्तुत 'भिमाची वाघीण ' हा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास जगताप, सचिव भास्कर पाडळे व कोषाध्यक्ष आनंदराव उघडे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या