महागणपतीला भाविकांच्या दानातुन ११ हजार आंब्यांची अारास

रांजणगाव गणपती,  ता.१०मे २०१६ (प्रतिनीधी) : येथील श्री महागणपतीला अक्षय तृतीयेनिमित्त सोमवारी भाविकांच्या दानातुन सुमारे अकरा हजार आंब्यांची आकर्षक आरास साकारण्यात आली होती.या वेळी भाविकांची  महागणपतीच्या दर्शनसाठी मोठी रिघ लागली होती.

या संदर्भात देवस्थान चे उपाध्यक्ष डॉ.संतोष दुंडे यांनी माहिती देताना सांगितले कि,काल (सोमवारी) अक्षय तृतीयेनिमित्त भाविकांनी सुमारे अकरा हजार आंबे महागणपतीला देणगी स्वरुपात अर्पण केले होते.या सर्व आंब्यांचे एकत्रिकरण करत पुष्प व फुलांच्या साहाय्याने मोठी अारास करण्यात अाली होती.

या अांब्यांचा प्रसाद म्हणुन भाविकांना वाटप करण्यात करण्यात अाल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी व्यवस्थापक रमाकांत शेळके, संभाजी गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या