बॅंकेत काम करत त्यांनी मिळवले "यूपीएससी" त यश

निर्वी ,  ता.७ मे २०१६ ( सतीश केदारी )  : येथील संदीप नानासाहेब पवार यांनी बॅंकेत काम करत नुकत्याच झालेल्या "यूपीएससी' परीक्षेत उज्जल यश संपादन केले अाहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत अाहे.

मुळच्या शेतकरी  कुटुंबात जन्मलेले  संदीप यांचे शिक्षण येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत झाले व माध्यमिक शिक्षण देखील येथील म्हसोबा प्रसारक शिक्षण मंडळाच्या हायस्कुल मध्ये झाले.त्यानंतर पुढील  उच्च शिक्षण त्यांनी  चंद्रपूर व दिल्ली येथे पुर्ण केले.संदीप यांची यूपीएससी परीक्षेत यशाची बातमी कळताच अाई वडीलांना मोठा अानंद झाला होता.

यावेळी संदीप यांच्याशी संपर्क साधला असता,आर्थिक परिस्थिती बेताची जरी असली तरीही न डगमगता यूपीएससी परीक्षेत यश मिळवायचे हे मनोमन ठरवले होते.पुणे येथील "आयडीबीआय' बॅंकेत काम करता- करता त्यामधून मिळेल त्या वेळी अभ्यास करत होतो.साठी बहुतांश वेळ हा अभ्यासासाठी खर्च करुन उर्वरीत वेळेत वाचनावर भर दिला.त्या मुळे निश्चित ध्येयापर्यंत पोहोचता अाल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.संदिप यांचे वडील नानासाहेब पवार यांनी, हे यश म्हणजे कठोर मेहनतीचेच फळ असल्याची प्रतिक्रिया दिली.

काल बुधवारी सायंकाळी(ता.११) रोजी ग्रामस्थांनी जंगी मिरवणुक काढुन त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात अाला.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या