कोंढापुरीचा तलाठी लाचप्रकरणी जाळ्यात

कोंढापुरी ,   ता.१३ मे २०१६ (मुकुंद ढोबळे) :  येथील कामगार तलाठीज्ञानेश्वर भगवान चौधरी(रा.बागवान नगर ,शिरूर )यांस जमिनी वरील कूळकायदा,शर्ती रद्द करण्यासाठी तीस हजारांची लाच घेताना शिरूर च्या नवीन प्रशासकीय इमारत पार्किंग मध्येच  लाचलूचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.शिरुर तालुक्यात वारंवार महसुलचेच  अधिकारी लाच घेत असल्याने महसुल ची प्रतिमा अधिकच मलिन झाली अाहे.

या संदर्भात लाचलूचपत विभागचे पोलीस उपअधिक्षक जे .डी .सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार,येथील  तक्रारदार यांच्या चूलत्याची जमीन असून ,याजमीनीवर कूळकायदा शर्ती उठून देण्यासाठी कोंढापूरी चे  कामगार तलाठि यांनी साठ हजारांची मागणी केली होती. या लाचेसंदर्भात तक्रारदाराने पुणे लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली होती.या तक्रारीची पडताळणी साक्षीदारांसमक्ष करून काल (ता.१२) रोजी सकाळी ११:४० वाजता लाचलूचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलूचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक जे.डी.सातव,पोलीस निरीक्षक अरुण घोडके,पो.ना.प्रशांत बोर्हाडे,नवनाथ माळी,चालक करुणाकरण यांच्या पथकाने शिरूर तहसीलदार कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत येथे सापळा रचून,  तक्रारदारा कडुन साठ हजार लाच मागितल्या पैकी तीस हजार रुपये  देण्याचे कबूल केले होते त्यानुसार तीस हजार देण्यासाठी तक्रारदार शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारत पार्किंग येथे आले व त्यांनी ही रक्कम कामगार तलाठि ज्ञानेश्वर चौधरी यांना सोपवताच लाचलूचपत विभागाचे कर्मचारी यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

या संदर्भात लाचलुचपत विभागाच्याअधिका-यांनी,जर कोणाला अशाप्रकारे शासकीय अधिकारी लाच मागत असेल तर लाचलूचपत कार्यालयाचे टोल फ्री नंबर १०६४ किंवा व्हाट्सअप नंबर ७८७५३३३३३३ यांच्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

महसुल चा मलिदा
दरम्यान मार्च महिन्यात दहिवडी येथील तलाठी लाच प्रकरनी रंगेहाथ पकडला होता.तसेच एप्रिल महिन्यात मलठन येथील मंडलाधिकारी लाचप्रकरणी जाळ्यात अडकले होते.तर अाता मे महिन्यात देखील लाचेचे नवीन प्रकरण समोर अाल्याने महसुलची प्रतिमा अधिकच मलिन होत चालल्याचे दिसत असुन गेल्यावर्षभरात अनेक तलाठी, मंडलाधिकारी जाळ्यात सापडले असुन महसुल ला चांगलाच मलिदा मिळत असल्याने व लालच वाढतच चालत असल्याने हि मालिका  अशीच सुरु राहणार कि पदाधिकारी गांभिर्याने पावले उचलणार हा मोठा प्रश्न अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या