लॉजवर छाप्यात सात मुलींसह तीन पुरुष ताब्यात

शिरूर,  ता. १४ मे २०१६ (मुकुंद ढोबळे) : येथील श्रेयांस लॉज वर असभ्य वर्तन करणाऱ्या सात मुलींना शिरूर व रांजणगाव पोलिसांच्या पथकाने संयुक्त टाकलेल्या छाप्यात  ताब्यात घेतले असून लॉज चालकासह तीन पुरुषांवर  कारवाई करण्यात आली असल्याचे शिरूर चे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यानी सांगितले .

याप्रकरणी सात मूली,लॉज चालक हरीष श्रीधर शेट्टी (रा.उडपि,कर्नाटक),कामगार रमण उत्तम चक्रवर्ती(रा .कलकत्ता),योगेश तुकाराम होले (रा .वाशिम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.या सर्वाना शिरूर न्यायालय येथे हजर केले असता त्यांना दहा हजार रुपये दंड व जामीन मंजूर करण्यात आला .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सूरजनगर जवळ प्रमुख रस्त्यावर असणाऱ्या श्रेयांस लॉज वर काही तरूणी असभ्य वर्तन करत असल्याचे माहिती पोलीसांना मिळाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस व शिरूर पोलीसांनी एकत्रित कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर,पोलीस कर्मचारी नितीन गायकवाड ,मंगेश ठिगळे,प्रकाश माने,राजू मोमीन,गुरु जाधव या कर्मचा-यांच्या पथकाने हॉटेल श्रेयांस लॉज यांच्यावर छापा टाकत तेथे सात मुली व तीन पुरुष यांना ताब्यात घेतले.

या सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान् निंबाळकर यांनी सांगितले .
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या