चासकमान चं पाणी मुरतयं कुठं;अांबळेत रास्ता रोको

न्हावरा,  ता.१४  मे २०१६ ( सतीश केदारी) :  गेल्या काही दिवसांपुर्वी चासकमान धरणातुन डाव्या कालव्याला सोडलेले पाणी अद्याप न पोहोचल्याने अखेर येथील शेतक-यांना रस्त्यावर उतरत अांदोलनाचा पावित्रा घ्यावा लागला अाहे.

चासकमान धरणातुन गेल्या काहि दिवसांपुर्वी पिण्यासाठी शेवटचे अावर्तन सोडण्यात अाले .परंतु खेडजवळ कालवा फुटल्याने अावर्तन बंद करण्यात अाले होते.कालवादुरुस्तीनंतर पुन्हा पाणी सोडण्यात येत होते.दरम्यान शिरुर तालु्क्यात हजारो हेक्टर क्षेत्र ओलीतााखाली अाहे.परंतु टेल टु हेड अशा पद्धतीने पाणी वाटप होणे गरजेचे असताना शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेच नसल्याने उरळगाव,न्हावरा,निर्वी,शिरसगाव काटा ही गावे मात्र तहाणलेलीच राहिली अाहेत.मागील अावर्तन सुमारे ४५ दिवस असुन देखील पुर्व भागातील निर्वी,शिरसगाव काटा या भागात एक थेंबदेखील पोहोचला नाहि.या चालु अावर्तनाला देखील तीच परिस्थिती असुन १५ दिवसांचे अावर्तन असताना पिण्यासाठी देखील एक थेंब या भागाच्या वाट्याला न अाल्याने या भागातील शेतकरी संतप्त झाले असुन हा तर राजकिय सुड तर नाहि ना अशा चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये  अाहे.अामदार बाबुराव पाचर्णे यांनी अावर्तन सोडताच टेल टु हेड असे अावर्तन सोडले जाईल असे भाकित केले होते.त्यांची हि घोषणादेखील हवेतच विरली कि काय ? असा सवाल शिरसगाव व परिसरातील शेतक-यांना पडला अाहे.

दरम्यान पाणी  बंद झाल्याचे समजताच अाज अांबळे, न्हावरे येथे संतप्त शेतक-यांनी रास्ता रोको अांदोलन करत निषेध व्यक्त केला.या वेळी शिरुर चे पोलीस निरिक्षक भगवान निंबाळकर,पाटबंधारे विभागाचे अधिकारी, यांना अापल्या मागण्यांचे निवेदन देण्यात अाले.यावेळी सरपंच शोभाताई खंडागळे,उपसरपंच सागर निंबाळकर,भाजपचे सुभाष कांडगे, महादेव जाधव,अनिल जाधव,युवराज निंबाळकर,दादा बिडगर,गणेश दरेकर अादी मान्यवर उपस्थित होते.

अांबळे येथे देखील शेतक-यांनी निषेध व्यक्त करत घोषणा दिल्या. या वेळी शेतकरी संघटनेच्या बाळासो घाडगे  यांच्या नेतृत्वाखाली अांदोलन करण्यात  अाले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष बापु शिवले,दिलिप बेंद्रे, संजय बेंद्रे,वसंतराव काळे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी उपस्थित शेतक-यांनी निषेध व्यक्त करत भावना मांडल्या व काहि काळ शिरुर-रास्ता चांगलाच अडवुन धरला होता.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या