शिरसगांव काटा येथे अपघातात एक जागीच ठार

शिरसगाव काटा ,  ता.१५  मे २०१६ ( सतीश केदारी) :  न्हावरा ते शिरसगाव काटा या मार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकी गाडीला धडक दिल्याने या अपघातांत नारायण मुकुंद  थोरात(वय-३५,रा.हातवळण ता.दौंड) यांचा जागीच मृत्यु झाला.तर नारायण कंुडलिक कर्दत(वय-४०,रा.हातवळण  हे जखमी झाले असुन यांच्यावर मांडवगण फराटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु अाहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातवळण (ता.दौंड) येथील नारायण थोरात व नारायण कर्दत हे दोघेजण दुचाकी गाडीवरुन न्हावरेवरुन शिरसगाव काटा या मार्गे चिंभळे(ता.श्रीगोंदा) कडे जात  असतानाच शिरसगाव काटा च्या हद्दीत चव्हाणवस्ती जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या (MH-42 AD-8875) या दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली.यानंतर संबंधित गाडी घटनास्थळावरुन फरार झाली. हि घटना समजताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेउन जखमी ला दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले.व त्यानंतर पोलीसांना या घटनेची माहिती दिली.

अपघाताची माहिती कळताच मांडवगण चे पोलीस कर्मचारी अाबासाहेब जगदाळे व किरण डुके यांनी त्वरीत धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.व  मयत नारायण थोरात यांचे शव  शवविच्छेदनासाठी पुढे  पाठवण्यात अाले.

या प्रकरणी मांडवगण पोलीस पुढील तपास करत अाहेत.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या