तहसिलदार पोळ यांचे पिंपळे ग्रामस्थांकडुन अाभार

पिंपळे खा., ता.२० मे २०१६ (प्रतिनीधी)  : तलाठी  कार्यालया संदर्भातील विविध प्रश्नांसदर्भात तहसिलदार पोळ यांनी लक्ष घालुन समस्या सोडविल्याने पिंपळे धुमाळ ग्रामस्थांनी तहसिलदार राजेंद्र पोळ यांचे नुकतेच अाभार मानले.

या संदर्भात अधिक माहिती अशी कि, येथील शेतकरी वसंतराव वामणराव धुमाळ हिवरे येथील  तलाठी  कार्यालया समोर  विविध प्रश्नांदर्भात  उपोषणास बसले होते. परंतु पंचायत समीती सदस्या दिपालीताई बाळासाहेब  शेळके यांच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन यशस्वी  झाले.अांदोलक शेतकरी वसंतराव धुमाळ यांच्या सर्व मागण्या शिरुर चे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी मान्य केल्या.

याप्रसंगी सरपंच राजेंद्र धुमाळ,कामगार  नेते दत्तात्रय दिनकर तांबे,निलेश  बाळासाहेब  धुमाळ,पांडुरंग सुरसे ,पिंपळे  आणि  हिवरे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.   
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या