शिरुर शहर युवक कॉंग्रेस च्या अध्यक्षपदी अमजद पठाण

शिरूर,   ता. २० मे २०१६ (प्रतिनीधी) :  शिरुर शहर युवक कॉंग्रेस च्या अध्यक्षपदी अमजद पठाण यांची निवड करण्यात अाली अाहे. या  निवडीचे पत्र कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते नुकतेच देण्यात अाले.

या निवडीवेळी जिल्हाध्यक्ष संजय जगताप,युवक कॉंग्रेस  चे जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद,शिरुर युवक चे तालुकाप्रमुख विजेंद्र सुभाष गद्रे ,नगरसेवक महेंद्र मल्लाव,केशरसिंग परदेशी,उपाध्यक्ष महेश जहदाळे,महेशबापु ढमढेरे,हुसेन शहा अादी मान्यवर उपस्थित होते.

अमजद पठाण यांनी अातापर्यंत पक्षासाठी दिलेले महत्वपुर्ण योगदान लक्षात घेत युवक कॉंग्रेस च्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपाविण्यात अाल्याचे तालुकाप्रमुख विजेंद्र सुभाष गद्रे यांनी सांगितले. तर तळागाळातील जनतेसाठी या पुढे लढा देणार असुन पक्ष संघटन व बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिेर्वाचित शहराध्यक्ष अमजद पठाण यांनी बोलताना सांगितले.

शिरुर तालुका कॉंग्रेस व  युवक कॉंग्रेस च्या पदाधिका-यांनी अमजद पठाण यांचे  निवडीबद्दल  अभिनंदन केले अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या