फळांचा राजा अद्याप सर्वसामान्यांच्या अावाक्या बाहेरच
कवठे यमाई, ता. २२ मे २०१६ (सुभाष शेटे) : फळांचा राजा आंबा हा अद्याप सर्व सामान्यांच्या आवाख्या बाहेर असल्याचे चित्र सध्या शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात भरणा-या आठवडे बाजारातून पहावयास मिळत आहे.
शिरुर च्या पश्चिम पट्ट्यातील मलठन, कवठे येमाई ,जांबूत .टाकळी हाजी इत्यादी मोठ्या गावातून आठवडे बाजारात हापुस,राजापुरी,देवगड ,पायरी व इतर जातीच्या आंब्याचे वाण मोठ्या प्रमाणात या आठवडे बाजारात विक्रीस येत अाहेत.सरासरी ८० ते १५० प्रती किलो व १५० ते २५० रुपये प्रती डझन आंब्याच्या प्रती प्रमाणे बाजारभाव असल्याने हा आंबा अद्यापही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाख्या बाहेरच असुन नागरिकांची कमी पसंती असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.ग्रामीण भागात या आंब्याच्या जाती बरोबरच गावरान आंब्याला देखील चांगली मागणी असते पण अद्याप पाहिजे तेवढा गावरान आंबा बाजारात दिसून येत नाही.व ग्राहकांनी देखील पाठ फिरवली अाहे.
पावसाळा तोंडावर अालेला असताना अाता तरी आंब्याचे भाव आवाक्यात येतील अशी आशा ग्रामीण भागातील सर्वसामान्य आंबा ग्राहक बाळगून आहेत.