वडीलांचे स्वप्न साकार केले- तहसिलदार राजेंद्र पोळ

शिरूर,   ता.२६ मे २०१६ ( सतीश केदारी ) : मुलांनी प्रशासकिय सेवेत जावे हे वडीलांचे स्वप्न होते.अथक मेहनत घेत अखेर वडीलांचे स्वप्न सत्यात उतरविले असल्याचे शिरुर चे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी संकेतस्थळाच्या वर्धापनदिनी झालेल्या दिलखुलास गप्पांत बोलताना सांगितले.
संकेतस्थळ अाज (ता.२६) रोजी  यशस्वी वाटचालीची पाच वर्ष पुर्ण करत अाहे.त्या अनुषंगाने शिरुर चे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी संकेतस्थळाचे कार्यकारी संपादक सतीश केदारी यांच्याशी दिलखुलास संवाद  साधला.जाणुन घेउया त्यांच्या अंतरंगातुन....

प्रश्न : तुमचं  बालपण अन शिक्षण कसं झालं?

सातारा जिल्हयातील छोट्या खेड्यात माझं बालपन गेलं.प्राथमिक शिक्षण  जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं.त्याच भागात माध्यमिक शिक्षण पुर्ण केलं.व उच्च शिक्षणासाठी पुण्यात दाखल झालो होतो. वडील शिक्षक होते.त्या मुळे घरी शैक्षणिक वातावरण चांगले होते.त्यावेळी घरची परिस्थिती  ब-या पैकी होती.

प्रश्न : प्रशासकिय सेवेत कसे अालात?

अाम्ही चौघे भावंडे होतो. वडील शिक्षक होते त्यामुळे वडीलांची इच्छा एकच होती चौघांपैकी कोणीतरी फौजदार अथवा तहसिलदार व्हावं.या साठी अाम्ही चार ही भावांनी प्रयत्न सुरु केले होते.सगळ्या  भावांमध्ये मीच प्रथम यशस्वी होत तहसिलदार झालो.अन वडिलांचे स्वप्न साकार केले.

प्रश्न :
तुमचा अादर्श कोण ?
सातारा जिल्ह्यातील अामच्याच भागातील पुण्याचे माजी पोलीस अायुक्त गुलाबराव पोळ हे पोलीस सेवेत होते.त्यांचा अादर्श ठेवुन गावातील युवकांनी अनेक स्वप्न रंगवत स्पर्धा परिक्षांची तयारी सुरु केली होती.त्यात अनेक  यशस्वी देखील झाले.त्यामुळे याच वातावरणात मी देखील वाढलो अाहे.

प्रश्न :तुमच्या कॉलेज जीवनाविषयी थोडक्यात काय सांगाल?
पुण्यात बी एस्सी झाल्यानंतर एम.एस्सी साठी राहुरी विद्यापीठात प्रवेश घेतला.त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा खुशी एकता मंच हा ग्रुप होता.या ग्रुप मध्ये दाखल होण्यासाठी नाममात्र फी होती.या ग्रुप मध्ये अभ्यासाबरोबरच धमाल तर खुप असायची पण त्या बरोबरच अनेकांना मदत देखील करायचो.या ग्रुप च्या माध्यमातुन एकमेकांना नोट्स शेअर देखील करत असु.ग्रुप च्या माध्यमातुन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा खुप होत असे.

प्रश्न : तहसिलदार म्हनुन अाजपर्यंत अालेला चांगला/ वाइट अनुभव सांगा

माझी २००८ साली नायब तहसिलदार म्हणुन निवड झाली.त्यानंतर २०१०-२०१२ या कालखंडात जिल्हाधिकारी कार्यालयात काम केले.दरम्यान सोलापुर ला काम करताना अनेक चांगले/ वाइट अनुभव अाले.यामध्ये एका ठिकाणी काम करत असताना रस्त्याचा  दलित-सवर्ण असा वाद होता.या प्रकरणात दलितावर अन्याय होत होता.तर दुसरीकडुन हरप्रकारे मोठ्या प्रमाणावर दबाव येत होता.परंतु योग्य निर्णय घेत दलिताला न्याय मिळवुन दिला.निर्णय झाल्यानंतर तो दलित व्यक्ती जेव्हां पेढे घेउन अाला तेव्हा अालेला अनुभव खुप शिकवुन गेला.

प्रश्न : शिरुर तालुक्याविषयी अालेला अनुभव?
शिरुर तालुका इतर तालुक्यापेक्षा फारसा संवेदनशील नाही.या ठिकाणी कर्मचा-यांबरोबरच स्थानिक अनेकांचं सहकार्य लाभतं.हे क्षेत्र वेगळंच असल्याने राजकिय दबाव नसतो.ज्या प्रमाणे अनेकांचा गैरसमज अाहे तशी परिस्थिती मुळीच नाहि.त्यामुळे काम करायला फारशा अडचणी या भागात येत नाहीत.

प्रश्न : महसुल च्या कर्मचा-यांची लाचखोरीत हॅटट्रिक झाली अाहे. काय प्रतिबंध केलाय का ?
या गंभीर प्रकरणांची दखल घेत सर्वच कर्मचा-यांनी नुकतीच तपासणी पुर्ण केली अाहे.अावश्यक त्या उपाययोजना देखील केल्या अाहेत.त्यात अशा कर्मचा-यांबाबत या पुढे खबरदारी घेतली जाणार अाहे.

प्रश्न : महसुल  कारवाइ करत नाहि यात तथ्य किती ?
गेल्या काहि दिवसांत महसुल पथकांच्या केलेल्या कारवाई पाहता  अाजतागायत या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महसुल कधीच जमा झाला नव्हता.तीन वर्षांपेक्षा एकाच वर्षात १ कोटि ४० लाख रुपयांपर्यंत वाळु चोरांकडुन दंड वसुल केला अाहे. फक्त नावासाठी प्रसिद्धी केली इतकेच.

प्रश्न : युवकांना काय संदेश द्याल?
नुकतेच दहावी/बारावी चे निकाल लागत अाहेत.या वेळी प्रवेशासाठी गोंधळुन न जाता योग्य मार्ग निवडा.अाता लगेच स्पर्धा परिक्षांच्या मागे न लागता पाया भक्कम करा मगच स्पर्धा परिक्षांच्या तयारीला लागा. यश फार दुर नाहि.

प्रश्न : संकेतस्थळाविषयी तुमचं मत काय ?
तालुक्याची इत्थंभुत माहिती असलेलं हे राज्यातलं एकमात्र संकेतस्थळ अाहे.याचा तालुक्यातील जनतेला खुप मोठा फायदा होत अाहे.सकारात्मक पण परखड अशी ओळख असलेल्या संकेतस्थळ www.shirurtaluka.com ला माझे मनापासुन धन्यवाद ! पाचव्या वर्धापनदिनास मनापासुन खुप खुप शुभेच्छा!

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या