हेच का ते अच्छे दिन?

शिरूर,  ता.२८ मे २०१६ (प्रतिनीधी) :  भाजप सरकारच्या विरोधात शिरुर तालुका कॉंग्रेस च्या वतीने शिरुर येथे अाज निषेध  मोर्चा अायोजित करण्यात  अाला होता.यावेळी भाजप सरकारच्या विरोधात हेच का ते अच्छे दिन असे म्हणत निषेध व्यक्त करण्यात अाला.

या वेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कौस्तुभशेठ गुजर, तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा शोभाताइ वाघचौरे,युवक कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे,शिरुर शहर युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष अमजद पठाण यांनी या मोर्चा चे नेतृत्व केले.

भाजप सरकारला दोन वर्ष पुर्ण होत असताना शेतमालाला बाजार नाही.दुधधंदा बाजार नसल्याने कोलमडलाय.तर शेतक-यांसाठी हे सरकार काहिच करत नसुन निष्क्रिय ठरले असुन हेच का ते अच्छे दिन म्हणत कॉंग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात अाल्या.प्रारंभी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन निषेध मोर्चा ला सुरुवात करण्यात अाली.
या प्रसंगी युवक चे उपाध्यक्ष महेश जगदाळे,नगरसेवक महेंद्र मल्लाव,सुरेश थोरात,अॅड.दिलीप करंजुले,बाळासाहेब फडतरे,केशरशिंग परदेशी, राजाभाउ मांढरे,महेशबापु ढमढेरे, मिलिंद  गायकवाड,ज्योती हांडे अादी कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी अांदोलकांनी इंदिरा गांधी पुतळा ते  तहसिलदार कार्यालय असा मोर्चा काढुन तहसिलदार  पोळ  यांना  मागण्यांचे निवेदन दिले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या