प्रसंगावधान व तत्परतेने वाचले शेतक-याचे प्राण

वरुडे,  ता.३० मे २०१६ (प्रतिनीधी) :  येथील शेतक-याचे प्राण प्रसंगावधान राखल्याने व पोलिसांच्या तत्परतेने वाचल्याची घटना घडली अाहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी कि, वरुडे येथील शेतकरी गोविंद किसन काळे हे शिरुर ला शेतमाल विक्रीसाठी घेउन गेले होते.दरम्यान  बाजारपेठेतच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका अाला.हि बाब स्थानिक व्यापा-यांच्या निदर्शनास येताच त्यांनी काळे यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले.परंतु तातडीने उपचार होणे गरजेचे असल्याने पुणे येथील रुग्णालयात नेण्याचे ठरले.परंतु शिक्रापुर पासुनच वाहतुक कोंडी सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर असते.

हि बाब लक्षात घेत वरुडेचे संतोष भरणे यांनी हि बाब पोलीसांना सांगत लक्ष घालण्याची विनंती केली.हि गोष्ट पोलीसांनी देखील लक्षात घेत वाहतुक मोकळी करण्यास  सुरुवात केली.दरम्यान शिरुर वरुन निघालेली रुग्णवाहिका रस्ता  मोकळा केल्याने कोठेही गर्दीत न अडकता अगदी कमी कालावधीत जास्तीत जास्त अंतर कापत रुबी हॉल या दवाखान्यात पोहोचु शकली.

रुबी हॉल येथील वैद्यकिय पथक देखील उपचारांसाठी तयारच असल्याने काळे यांच्यावर तातडीचे उपचार करण्यात अाले.

या सर्व मदतीसाठी लोणीकंद,वाघोली,येरवडा,चंदननगर येथील पोलीस व वाहतुक कर्मचा-यांनी मोठी मेहनत घेतली.

 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या