युवकांच्या व्हॉट्सअप ग्रुप ची "अनाथांची माय" ला मदत

शिरूर,  ता.३१ मे २०१६ (सतीश केदारी) : विद्याधाम प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांच्या शिरुर गॅंग या  व्हॉट्‌सऍप ग्रुपने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून  सिंधुताई सपकाळ यांच्या सामाजिक संस्थेला दोन लाख २५ हजार रुपयांचा धनादेश नुकताच  सुपूर्त केला आहे.

विद्याधाम प्रशालेतील सन १९९९ मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ६० माजी विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे.या ग्रुपमधील अनेक  सदस्य हे सरकारी सेवा,वैद्यकीय,उद्योग,शैक्षणिक,सामाजिक आदी क्षेत्रांत कार्यरत आहेत.या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.या ग्रुपचे एकत्रित बॅंकेत खातेही उघडण्यात आले आहे. या खात्यात सर्व सदस्य विशिष्ट रक्कम जमा करतात.त्यातून सामाजिक उपक्रम राबविला जातो. या वर्षी सर्वांनी एकत्रित येत मांजरी येथील संस्थेला मदत करण्याचे ठरविले होते.त्यानुसार पैसे गोळा करत नुकताच धनादेश माईंच्या संस्थेला देण्यात अाला.या धनादेशाचा स्वीकार केल्यानंतर सिंधुताईंनी या ग्रुपचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "नेहमी अनेकजण काहि ना काहि मदत करत असतात.परंतु वस्तुरुपी मदतीपेक्षा अार्थिक मदत हि खुप मोलाची ठरते.या वेळी अालेल्या सर्वच ग्रुप च्या सदस्यांचे स्वागत करुन अाभार  मानले.तसेच या वेळी भविष्याची चिंता देखील बोलुन दाखविली.

व्हॉटसअप ग्रुप च्या युवकांनी गतवर्षी नाम या संस्थेला मदत केली होती तर या वर्षी सिंधुताईंच्या संस्थेला मदत केल्याने या ग्रुप चं तालुक्यात कौतुक होत अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या