घराकडे जावं कसं ? लांडगे कुटुंबाची कैफियत

मांडवगण फराटा,  ता.१ जुन २०१६ (संपत कारकुड) :  येथील ग्रामपंचायत च्या गावठाण हददीमध्ये राहत्या घराकडे येणा-या रस्त्यांवरच बेकायदेशिर (आरसीसी) बांधकाम चालू केल्यामुळे घराकडे जाण्यास रस्ताच राहिला नसल्यामुळे व केलेल्या तक्रारीलाही न जुमानता उलट बांधकामच जोरात चालू केल्यामुळे येथील माणिक महादेव लांडगे व त्यांच्या कुटुंबाला आपल्या घराकडे जावे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

याची सविस्तर माहिती अशी की, येथील शासनाच्या जागेवर अतिक्रमण केलेली व फक्त ग्रामपंचायतीला घरपट्टीपुरती नोंद असलेली जागा पोपट माने यांनी त्यांचे नातेवाईक असलेले संतोष शंकर जाधव यांना विकत दिली.या नातेवाईकांनी ग्रामपंचायतीची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनाधिकृत विकत घेतलेल्या जागेमध्ये इतर नागरिकांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर आरसीसी काॅलम ठोकल्यामुळे लांडगे कुटुंबाचे घराकडे जाणे-येणे बंद झाले आहे.त्यामुळे अगदी दोन ते अडीच फुटाच्या बोळीमधुन कसेबसे येथील नागरिकांना आपल्या घरांकडे जावे लागत असल्यामुळे ताबडतोब हे बांधकाम थांबविण्यासाठी लांडगे कुटुंबियांनी ग्रामपंचातीकडे लेखी तक्रार दाखल केली.

ग्रामपंचायतीने बांधकाम होत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता बांधकामधारकांनी तात्पुरत्या स्वरुपात ग्रामपंचायत पाहणी पथकापुढे जागा सोडतो असे सांगुन हा विषय तात्पुरता मिटवत सुटीच्या दिवशी बांधकाम उरकण्याचा सपाटा सुरु केला अाहे. या प्रकारामुळे येथील माणिक लांडगे कुटुंबाला घराकडे जाता येत नाही.

या संदर्भात लांडगे कुटुंबियांनी पंचायत समिती च्या सहायक गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटुन अापली कैफियत मांडली.या वेळी सहायक गटविकास अधिकारी अशोक बांगर यांनी, या वेळी पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही या कुटुंबाला दिली.

ग्रामपंचायत नेमकी करते तरी काय?
ग्रामपंचायत हददीमध्ये झालेली सर्व बेकायदेशीर बांधकामांबात ग्रामपंचायत बघुन न बघितल्यारखे करते अाहे.आतापर्यंत गावच्या हददीमध्ये बहुतांश बांधकामे ही विनापरवाना करण्यात आली आहेत.कोणतेही बांधकाम करताना रस्त्यासाठी पुरेशी जागा सोडली नसल्यामुळे कित्येक नागरिकांना रस्त्यासाठी जागा नाही.याची तक्रार करुनही फक्त नोटीस देण्याशिवाय ग्रामपंचातीने आत्तापर्यंत कोणतीही कठोर ठोस कारवाई केल्याचे निदर्शनास नाही.तेव्हा ग्रामपंचात नेमके करते काय? असा सवाल येथील नागरिकांकडुन उपस्थित होत आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या