...अखेर लांडगे कुटुंबाला मिळाला न्याय

मांडवगण फराटा,  ता.३ जुन २०१६ (संपत कारकुड) :  येथील गावठाण हददीमध्ये गेली ४०वर्षांपासून राहत असलेल्या माणिक लांडगे व त्यांच्या कुटुंबाची रस्त्याची अडचण लक्षात  घेत  संकेतस्थळाने बातमी प्रसिद्ध करताच ग्रामपंचायत प्रशासनाने खदबडुन जागे होत प्रत्यक्ष पाहणी करुन  संबंधित ठिकाणी अधिकृत रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याने लांडगे कुटुंबाची गैरसोय दुर होणार अाहे.

सविस्तर माहिती अशी कि, येथील लांडगे कुटुंबाबरोबरच येथील अनेक नागरिकांना कित्येक दिवसांपासुन आपल्या घराकडे जाण्यासाठी अधिकृत असा रस्ताच नव्हता व सध्याही नाही. याविषयी नागरिकांनी केलेली तक्रार व प्रत्यक्ष ठिकाणची माहिती घेवून संकेतस्थळ www.shirurtaluka.com ने या विषयी सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते.ही बातमी व्हाॅटसपद्वारे मांडवगण फराटा व परिसरांमध्ये पसरताच अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. या संदर्भात ग्रामपंचायत च्या सरपंच सुवर्णाताई फराटे, सदस्य अशोक जगताप, सचिन शितोळे, संजय फराटे, तुकाराम थोरात,अंकुशराव जगताप तसेच  गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांसह शिरुर तालुका डॉटकॉमचे  विशेष प्रतिनिधी यांनी तत्काळ घडनास्थळी जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता तिथे रस्त्याची अत्यंत विदारक स्थिती समोर आली. येथील नागरिकांना घरकुल योजनेअंतर्गत घर व राहण्यासाठी पुर्वी जागा मिळाल्या आहेत.या जागेवर येथील नागरिकांनी बांधकाम करतांना सर्व नियम धाब्यावर बसवून वाटेल तसे बांधकाम केलेले आहे.नागरिकांना रस्ता ठेवावा लागतो हेच येथील नागरिकांना माहित नाही.आपण बांधकाम केल्यानंतर आतमध्ये राहणा-या नागरिकांना गैरसोईचे होईल याची कोणी चिंता येथे केली नाही.वाटेल तसे बांधकाम व त्यावर ग्रामपंचातीने केलेली डोळेझाक अशा सर्व परिस्थितीमध्ये आपणच आपल्या हाताने गैरसोई करीत आहोत हे त्यांना उशिरा का होईना समजले आहे.शासनाने दिलेली प्रत्यक्ष जागा आणि वस्तुस्थितीवरील बांधकामे पहाता यामध्ये मोठी तफावत दिसून येत असून आता रस्त्यासाठी येथे कुठेही अधिकृत जागाच नसल्यामुळे आतमध्ये जायचेच कसे? हा प्रश्न लांडगे कुटुंबासह इतरांनाही पडला.घर व जागा देताना शासनाच्या अधिका-यांनी येथे जाण्यायेण्यासाठी रस्ते ठेवले असतील आणि रस्त्यावर तर कोणाला जागा दिली नाही. मग हे रस्ते गेले कुठे ? आणि ते आडविले कसे हा प्रश्न येथे प्रत्यक्ष पाहणीमध्ये समजला असून सिटीसर्वेकडील सर्व जागांचे नकाशे व मालकी हक्काचे इतर कागदपत्रे काढल्यावरच याची वस्तुस्थिती उजेडात येणार आहे.

ग्रामपंचातीने सामंजस्याने  रस्त्यासाठी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला असून मासिक मिटिंगध्ये ठराव करुन पंचायत समितीकडे 10 फुट रस्त्याचा प्रस्ताव करण्याचा निर्णय त्यांनी येथील नागरिकांसमोर जाहिर केला आहे. खरेच ग्रामपंचायतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे रस्ता झाल्यास येथील सर्व रहिवाशांना तो सोईचा होईल. त्याचबरोबर येथील नागरिकांचा रस्त्यांचा प्रश्न कायमचा मिटेल.आता ग्रामपंचायत नेमके काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या