बहुप्रतिक्षेनंतर शिरसगाव ला टॅंकर सुरु

शिरसगाव काटा,  ता.५ जुन २०१६ (प्रतिनीधी) :  येथे अाज बहुप्रतिक्षेनंतर पिण्याच्या पाण्यासाठी दोन टॅंकर सुरु करण्यात अाले.टॅंकर गावात पोहोचताच ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे  भरवुन स्वागत करण्यात अाले.

दुष्काळाचे सावट गतवर्षेीप्रमाणे याही वर्षी शिरुर तालुक्याला बसले असुन तालुक्याच्या पुर्व भागातील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत अाहे.गेल्या काहि दिवसांपुर्वी या परिसरातील इनामगाव येथे टॅंकर सुरु करण्यात अाला होता.त्याचबरोबर शिरसगाव च्या ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती.गावाबरोबरच वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावत अाहे.गावासाठी पाणीपुरवठा करणारा एकमेव बोअरवेल ची पाणी पातळी खालावल्याने ग्रामपंचायत ने गतवर्षी खोदलेली विहिरी चे काम करुन तात्पुरत्या स्वरुपात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता.परंतु त्या पाण्याची देखील शास्वती नसल्याने पाणी टंचाइ हि मोठी समस्या होती.
ग्रामपंचायत चे सरपंच संजय शिंदे,उपसरपंच विजेंद्र गद्रे, नरेंद्र माने अादींनी (ता.२६) एप्रिल रोजी प्रशासनाकडे  टॅंकर साठी मागणी करत प्रस्ताव सादर  केला होता.या ग्रामपंचायत पदाधिका-यांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी करत सुमारे एक महिन्यानंतर प्रशासनाने दखल घेत अाज दोन टॅंकर उपलब्ध करण्यात अाले.
टॅंकर गावात पोहोचताच ग्रामस्थांनी जलपुजन केले.त्याचबरोबर एकमेकांना पेढे भरवुन अानंद साजरा करण्यात अाला.

यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष एम.एस.कदम,विकास जगताप,प्रकाश जाधव,दिलीप कदम व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या