शिरुर ला दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण

शिरूर,  ता.७ जुन २०१६(प्रतिनीधी) :  येथील  बांधकामावर काम करणार्‍या मजुराच्या दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिला दीड ते दोन किलोमीटरवर अज्ञात स्थळी टाकून देण्यात अाल्याची घटना घडली अाहे.याप्रकरणी अज्ञात इसमावर अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

 
सविस्तर  माहिती अशी कि,शिरुर येथील नवीन बाजार समितीजवळ संतोष शितोळे यांच्या बांधकामावर या मुलीचे आई-वडील मजुरी काम करतात. (ता.५) जून रोजी रात्री १२ वाजता संबंधित मुलीचे वडील वरच्या मजल्यावर,तर आई व त्यांची दीड वर्षाच्या मुलीसह इतर मुलांबरोबर खाली शेडमधे झोपल्या होत्या.रात्री दोन वाजता मुलीच्या आईला जाग आल्यावर त्यांची दीड वर्षाची मुलगी दिसली नाही.त्यांनी ही मुलगी नसल्याचे झोपलेल्या पतीला जाऊन सांगितले.त्यानंतर त्यांनी सकाळपर्यंत मुलीचा शोध घेतला; परंतु ती सापडली नाही.

सोमवारी (ता.६) जून रोजी सकाळी ९ वाजता त्यांना कामाठीपुरा येथील दर्ग्याजवळ लहान मुलगी सापडली असल्याचे समजले.यानंतर संबंधित मुलीच्या पालकांनी त्या ठिकाणी जाउन पाहिले असता त्यांचीच मुलगी असल्याचे त्यांना समजले. या नंतर त्या बालिकेला तत्काळ  उपचारांसाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.व पुढील उपचारांसाठी ससुन हॉस्पिटल ला दाखल करण्यात अाले अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या