प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी ला ' क' तिर्थक्षेञ दर्जा

विठ्ठलवाडी,  ता. ९ जुन  २०१६(प्रा. एन .बी .मुल्ला) :शिरूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या विठ्ठलवाडी या गावातील पांडुरंग देवस्थान ला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आमदार बाबूराव पाचर्णे व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून मिळाला  असल्याची  माहीती  ग्रामस्थांनी दिली.

येथील पांडुरंग देवस्थान च्या दर्शनासाठी अनेक दुरवरुन भाविक येत असतात .तसेच तिर्थक्षेत्राचा दर्जामिळावा ही अनेक दिवसांपासुन ग्रामस्थांची मागणी  होती.या साठी बाजार समितीचे संचालक राहुल गवारे,जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारे व इतर ग्रामस्थांनी  विठ्ठलवाडीला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला अाहे.

'क" वर्ग दर्जा मिळाल्याने  विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी एकमेकांना  पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या