शिरसगाव च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

शिरसगाव काटा,  ता.९ जुन २०१६ (प्रतिनीधी) :  येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या दहावी च्या परिक्षेत उज्जवल यश संपादन केले अाहे.

ऋतुजा अण्णासाहेब कदम हिने अथक मेहनत घेत ९४.४० टक्के गुण प्राप्त करत विद्याधाम प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला अाहे.अनोज नरेंद्र माने याने ९०.८० तर संध्या दत्ताञय लोंढे हिने देखील ९० टक्के गुण मिळविले अाहे.वैष्णवी बाळासो भोइटे हिने ८९.८० तर पुजा सुदाम केदारी व फारुक दिलावर शेख यांनी अनुक्रमे ८०.८० टक्के मिळविले अाहे.


यातील बहुतांश विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना व कुठेही क्लास न लावता  या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केल्याने ग्रामस्थांकडुन यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करण्यात येत अाहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना सुर्यकांत गायकवाड,सचिन विधाते,सचिन अावारे,फराटे अादींनी मार्गदर्शन केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या