तहसिलदारांसह इतर तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती,  ता.१० जुन २०१६ (विशेष प्रतिनीधी) : येथील औदयोगिक वसाहतीमधील औदयोगिक विभागाने संपादन केलेला भुखंड बनावट कागदपञे सादर करून विक्री केल्याचा प्रकार नुकताच उघडकिस आला असुन या संदर्भात औदयोगिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी , शिरूरचे तहसिलदार , मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर रांजणगाव पोलिस ठाण्यात फसवेगिरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या संदर्भात भुजंगराव तुकाराम उगले रा.कर्वेनगर पुणे (मुळ गाव पेडगाव ता,श्रीगोंदा) यांनी शिरूर कोर्टात अर्ज दाखल केला होता.सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने शिरूर कोर्टाने औदयोगिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी अजित देशमुख,तहसिलदार राजेंद्र पोळ,मंडलाधिकारी ज्ञानेश्वर बेंडभर, कारेगावचे कामगार तलाठी एस.टी.देशमुख यांच्या विरोधात सी.आर.पी.सी.156(3) आय.पी.सी.465,466, 418 , 477 , 166 ,167 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिरूर पोलिसांना दिले होते.त्या प्रमाणे शिरूर पोलिसांनी सदर गुन्हा दाखल करून रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे. या बाबत रांजणगाव पोलिसांशी संर्पक साधला असता, सदर गुन्हयाचा तपास करून कोर्टात अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.रांजणगाव औदयोगिक वसाहतीमधील कारेगाव हद्दीतील 443 गट नंबर मधील 7 हेक्टर 64 आर क्षेञ औदयोगिक विभागातील काही अधिकारी व महसुल विभागातील काही अधिकारी यांनी औदयोगिक विभागाचे भुसंपादनाचे शिक्के असताना ही या 443 गट नंबर वरील क्षेञाची संगनमताने बनावट कागदपञे सादर करून खरेदीखत केल्याची बाब उगले यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली.कारण 1992 साली या 443 गटाचे औदयोगिक विभागाकडुन भुसंपादन होउन जमिनचे मुळ मालक असलेल्या कौशल्या शिवाजी नवले,अनिल शिवाजी नवले व इतर जणांना त्याचा मोबदला मिळाला आहे.

माञ औदयोगिक विभागातील व महसुल विभागातील काही झारीतील शुक्राचार्यांनी आपल्या स्वार्थासाठी बनावट कागदपञे सादर करून संगनमताने फसवणुक केली असल्याचा तक्रारी अर्ज भुजगंराव उगले यांनी कोर्टात सादर केल्यावर या अर्जाची दखल घेत पोलिसांनी या संबंधित औदयोगिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी अजित देशमुख,तहसिलदार राजेंद्र पोळ,मंडलाधिकारी ज्ञानेश्वर बेंडबर,कारेगावचे कामगार तलाठी एस.टी.देशमुख यांच्या विरोधात बनावट कागदपञे तयार करून फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या