शिरुर युवक कॉंग्रेस ला "अालयं बाळसं"

शिरूर,  ता.१० जुन २०१६ (सतीश केदारी) : पदाधिकारी बदलानंतर  शिरुर तालुका युवक व शहर युवक कॉंग्रेस मध्ये सध्या चांगलेच चैतन्याचे वातावरण जाणवु लागले अाहे.तर दुसरीकडे तालुक्याच्या कार्यकारीणीत देखील बदल होणार का ? याबाबत कुजबुज ऐकायला येत अाहे.

कॉंग्रेस  चे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या निवडीनंतर प्रथमच शिरुर युवक कॉंग्रेस मध्ये बदल करण्यात अाले अाहेत.युवक कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे यांच्या सुत्रबद्ध नेतृत्वाखाली गेल्या काहि दिवसांपासुन युवक ची सर्वच कार्यकारीणी  चांगले काम करत असल्याची पहावयास मिळत अाहे.जिल्हाध्यक्ष संजय जगताप व पक्षाच्या सुचनेनुसार युवक कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे यांच्याकडुन नुकतेच शहर व तालुका युवक च्या कार्यकारीणीत बदल करण्यात अाले.शिरुर शहर कॉंग्रेस मध्ये गेल्या दोन वर्षांपासुन काम करत असलेले महेश जगदाळे यांची बढती म्हणुन तालुका उपाध्यक्षपदी वर्णी लागली.तर अमजद पठाण यांना देखील शिरुर शहर युवक अध्यक्ष म्हणुन काम करण्याची संधी मिळाली अाहे.

'युवक' झाली अधिकच तरुण
शिरुर तालुका व शहर च्या युवक कॉंग्रेस च्या कार्यकारीणीमध्ये काम करणा-या पदाधिका-यांचे  व कार्यकर्त्यांचे वैशिष्टय म्हणजे सर्वच  कार्यकर्ते अगदी कमी वयाचे असुन पन्नाशी चे कमी व पंचविशी च्या पुढचे वय असणारे कार्यकर्ते जास्त असल्यामुळे युवक कॉंग्रेस ख-या अर्थाने तरुण झाली अाहे.

पदाधिकारी बदल होणार ?
युवक कॉंग्रेस च्या कार्यकारीणीत नुकताच बदल करण्यात अाला याच पार्श्वभुमीवर तालुका कॉंग्रेस मध्ये देखील बदल होणार असल्याची कुजबुज ऐकायला मिळत अाहे.गेल्या अनेक वर्षांपासुन तालुका कार्यकारीणी वर अध्यक्षपद एकहाती असल्याने अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जात अाहे.त्या मुळे अभी नही तो कभी नही असा सुर देखील कार्यकर्त्यांमध्ये अाळवला जात अाहे.शेवटी मरगळ अालेल्या तालुका  कॉंग्रेस च्या  संघात बदल होणार का? नवीन फलंदाज नवखा कि अनुभवी मिळनार याची उत्सुकता असणार असुन त्यासाठी अनेक इच्छुक देखील अाहेत.

या संदर्भात इच्छुकांची भेट घेतली असता पक्षाने संधी दिली तर नक्कीच गतवैभव प्राप्त करुन देउ असे अनेकांनी सांगितले. त्यामुळे वेट अॅंड वॉच च्या भुमिकेत इच्छुक अाहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या