पोलीस चौकी काय कामाची ?

मांडवगण फराटा,  ता.१२ जुन २०१६ (संपत कारकुड) : मांडवगण फराटा पोलीस चौकीत अवघे बोटावर मोजता येतील इतकेच कर्मचारी असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असुन अनेकांना तालुक्याच्या वा-या कराव्या लागत अाहेत.

शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत नुकत्याच अनेक बदल्या करण्यात अाल्या.या मध्ये अनेक अौट पोस्ट वरील कर्मचा-यांच्या देखील बदल्या करण्यात  अाल्या. या मध्ये मांडवगण फराटा पोलीस चौकीवरील देखील कर्मचा-यांची बदली करण्यात अाली.परंतु लोकसंख्येचा विचार केला असता जेवढे मनुष्यबळ उपलब्ध असायला हवे तेवढे या ठिकाणी अाजपर्यंत तरी कधी दिले गेले नाही.या उलट अाता बदली केल्यानंतर या चौकीवर फक्त दोनच कर्मचारी शिल्लक राहिले अाहे.या पैकी एका कर्मचा-याला  शिरुर पोलीस स्टेशन ला जावे लागते.तर उर्वरीत कर्मचा-याने काय करायचे हाच सवाल पडतो.

त्यामुळेच असंख्य नागरिक येथे तक्रार देण्यासाठी आल्यास अनेकवेळा येथील पोलिस कर्मचारी भेटत नाही.तक्रारदारांस वेळेत तक्रारच दाखल करता येत नसेल तर हे पोलिस स्टेशन काय कामाचे असा प्रश्न पडतो. येथील बहुतांश  स्टाफ निवृत्तीच्या उबंरटयावर असून त्यांना येथील काम पुर्ण  क्षमतेने करता येत नसल्यामुळे त्यांच्याकडुन सामान्यांना न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. ज्या काही तक्रारी येतात त्या तक्रारी महिनोमहिने धुळ खात पडतात.

या परिसरात येणा-या प्रमुख गुन्हयांपैकी बांध फोडी, रस्त्यावरुन होणारे वाद, मालमत्ता,कौटुंबिक वाद इत्यादी प्रकारच्या तक्रारी  मोठ्या प्रमाणावर दाखल होतात.केवळ स्टाफ नाही त्यामुळे तक्रार दाखल करुन न्याय देण्यास वेळ लागतो या नेहमीच्या पालुपदाला येथील असंख्य तक्रारदार कंटाळले आहेत. त्यामुळे नागरिकांना देखील तालुक्याच्या वा-या करण्याची वेळ येत अाहे. या पोलिस स्टेशनला आत्तापर्यंत जेवढी प्रकरणे तडजोडीने मिटविली गेली आहेत त्यामुळे भांडण  केले तरी पोलिस आपले काही वाकडे करीत नाही, असे धाडस येथील धनदांडगे व भांडखोर नागरिकांमध्ये विश्वासाने बोलले जात आहे.

दबंग पोलीस कर्मचारी द्या
मांडवगन फराटा पोलीस चौकीत दबंग अधिका-यांची वानवा असल्याने अनेक गुन्हेगारांचे चांगलेच फावत असुन या चौकीवर दबंग कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.अाहे.

मनुष्यबळ उपलब्ध करुन देउ

या संदर्भात सहायक पोलीस निरिक्षक उत्तम भजनावळे यांना विचारले असता बदल्यांमुळे विस्कळितपणा अाला असुन कर्मचारी उपलब्ध झाल्यास या ठिकाणी तत्काळ या चौकीवर कर्मचारी देण्यात येइल असे त्यांनी बोलताना सांगितले.


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या