ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता- अा.पाचर्णे

निमोणे,  ता.१४ जुन २०१६ (तेजस फडके) : :"ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते. UPSC आणि MPSC स्पर्धेत निवड झालेली बहुतांशी मुले हि ग्रामीण भागातुनच आलेली असतात. शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारी अनेक मुले आज मोठे अधिकारी झालेले आहेत " असे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी निमोणे येथे बोलताना व्यक्त केले.

निमोणे  येथील  'निमोणे आयडॉल्स " या व्हॉट्सअप गृपच्या वतीने दहावीच्या तसेच इतर गुणवंत विदयार्थांचा सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ. दिनकर सरोदे यांची उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने सरोदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी रविंद्र काळे बोलताना म्हणाले  कि," ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधांचा अभाव असतानाही दहावीतल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे.कला क्रीडा क्षेत्रातही ग्रामीण भागातले विद्यार्थी नाव उज्ज्वल करत आहेत.

या कार्यक्रमात इ.१०वी. व इ.१२ वी.च्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळणाऱ्या २५,कला व क्रिडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय व राज्य पातळीवर विशेष कामगिरी करणाऱ्या ५,त्याचप्रमाणे नायब तहसिलदार पदावर निवड झालेल्या निलम ढोरजकर या सर्वांचा पालकांसमवेत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नागेश्वर देवस्थान ट्रस्टचे ज्ञानेश्वर काळे, नायब तहसिलदार निलम ढोरजकर, नागेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक जालिंदर काळे, डॉ. पुरुषोत्तम जगदाळे, सायली दळवी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.     
यावेळी संचालिका शालन ताई काळे,नानासो काळे,पांडुरंग दुर्गे,दिलिप हिंगे, रविंद्र थोरात, अंकुश जाधव, डॉ. किसनराव आगरकर, डॉ. वैशाली आगरकर,मयूर ओस्तवाल,अंजनाबाई गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पुरुषोत्तम जगदाळे यांनी  तर सुत्रसंचालन गौतम दळवी व राहुल पवार तर आभार रविंद्र थोरात यांनी मानले.

अन डोळे पाण्याने डबडबले...

निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दिनकर सरोदे मनोगत व्यक्त करताना भावनाविवश झाले.त्यामुळे मान्यवरांसह ग्रामस्थांचे डोळेही पाण्याने डबडबले थोडयावेळ सगळीकडे वातावरण धीरगंभीर झाले होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या