शिरुर ला परिचारिकांचा एक दिवसीय लाक्षणिक संप

शिरूर,  ता.१६ जुन २०१६ (मुकुंद ढोबळे) : सुश्रुषा  संवर्गातील अधीपरिचारीका सेवा नियमित करण्यासाठी शासनाने  परीक्षा देणे बंधनकारक केल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी  शिरूर ग्रामीण रुग्णालय व शिरुर आरोग्य पथक शुश्रषा संवर्गातील परिचारीका व ब्रदर यांनी एक दिवसांचा लाक्षणिक संप व धरणे आंदोलन केले.

यावेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन चे सचिव संदीप लंगडे,बाबूराव कर्डिले,परिचारिका सुरेखा चिखले,शुभांगी गावडे,सुवर्णा टेमकर,राजश्री सूर्यवंशी,पूनम हिंगे,दुर्गा काटे,ब्रदर सचिन भीसे,सचिन शिंतोळे,अमोल जामकर,अल्फा ठाकूर,सुनिल कोतकर,उपस्थित होते .
 
यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.सार्वजनिक विभागातील बंधपत्रित परीक्षा रद्द करावी,बदामी रंगाचे गणवेशाचे आदेश अद्याप मिळाले नाही.प्रमाणकानुसार पदे नाहीत,मंजूर पदातील अनेक पदे रिकामी आहेत.सार्वजनिक विभागातील (आरोग्य )परिचारीकांची पदे रिक्त आहेत ती भरावी अशा विविध मागण्यांसाठी परिचारिंकाच्या वतीने धरणे आंदोलन व एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या