अन विद्यार्थी ही गेले हरखुन...

शिरसगाव काटा,  ता.१७ जुन २०१६ (प्रतिनीधी) : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नव्या को-या वह्या मिळाल्याने विद्यार्थी चांगलेच हरखुन गेले होते.

शिरसगाव काटा येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांच्या वतीने  गरीब व गरजु  विद्यार्थ्यांना नुकतेच वह्या वाटप करण्यात अाले.

या वेळी सरपंच संजय शिंदे,ग्रा.पं सदस्य प्रकाश जाधव,मनसे चे अध्यक्ष राहुल कदम,दिगांबर चव्हाण,काशिनाथ काटे,गोपाळ काटे,मच्छिंद्र कुलाळ ,मुख्याध्यापक संदीप अाढाव,शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देउन स्वागत करण्यात अाले. त्यानंतर प्रास्ताविक संदिप अाढाव यांनी करत शाळेतील गतवर्षीच्या व या वर्षी राबवणार असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.या नंतर सुमारे १५० गरजु  विद्यार्थ्यांना वह्या वाटप  करण्यात अाले.

मनसे चे अध्यक्ष राहुल कदम यांनी राबवत असलेल्या भविष्यात राबविणा-या विविध उपक्रमाची माहिती उपस्थितांना देउन उपस्थित सर्वच मान्यवर व पालकांचे अाभार व्यक्त केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या