दुष्काळग्रस्तांसाठी कारेगावकरांची 'लाख' मोलाची मदत

कारेगाव,  ता.१७ जुन २०१६ (संभाजी गोरडे) :  दुष्काळग्रस्तांच्या वेदनांना समजुन घेत  कारेगाव ग्रामपंचायत कडुन नुकतीच एक लाखाची मदत मुख्यमंञ्यांकडे देण्यात अाली.

या वेळी अामदार बाबुराव पाचर्णे, भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे,तालुकाध्यक्ष भगवान शेळके, हवेलीचे गणेश कुटे, सरपंच अनिल नवले,उपसरपंच नवनाथ नवले, रामभाउ दाभाडे, कामगार अाघाडी चेगणेश ताठे, ग्रा.पं.सदस्य राजेंद्र नवले, सचिन अाबनावे, निकेतन नवले, तेजस फलके अादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रसंगी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी कारेगाव ग्रामपंचायत च्या विविध उपक्रमांची माहिती घेत समाधान व्यक्त केले.तसेच केलेल्या कामांचे कौतुक देखील केले.

या वेळी पेयजल योजनेसाठी निधी मिळवण्यासाठी रांजणगाव वसाहतीचे 'रांजणगाव-कारेगाव औद्योगिक वसाहत' असे नामकरण करण्यात यावे या विविध मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना देण्यात अाले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या