आमदाबादला जलयुक्त शिवार चे काम पुर्ण - ऋषिकेश पवार

आमदाबाद,  ता.१९ जुन २०१६ (सतीश केदारी) : येथे लोकसहभागातुन जलयुक्त शिवाराअंतर्गत तलाव गाळकाढणी व नाला खोलीकरणाची कामे झाल्याची माहिती ऋषिकेश पवार  यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना पवार म्हणाले कि या भागातील जनतेची  दुष्काळातुन कायमची सोडवणुक करण्यासाठी सायबेज आशा ट्रस्ट लि. या कंपनी तर्फे जलंसधारणाची कामे हाती घेण्यात आली होती.यासाठी दीपक नथानी यांनी या कामासाठी 20 लाख रुपयांचा निधी दिला होता.त्याचबरोबर ग्रामस्थांचे देखील सहकार्य होते. त्यानुसार गावतलावातून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते.नुकतेच नाला खोलीकरण पुर्ण करण्यात अाले. या झालेल्या कामामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी पूरवठा योजनेला मोठा फायदा होणार आहे.तलावातून मोठा गाळ काढण्यात आला असुन या गाळामुळे परिसरातील शेतीच्या सुपीकतेसाठी हा गाळ उपयोगी पडला आहे असेही त्यांनी सांगितले.

पुढे माहीती देताना सांगितले कि, नाला खोलीकरणाच्या या कामातून प्रत्यक्षात ३०० एकर क्षेत्र व ५० विहिरींना पाण्याची उपलब्धता होणार आहे.त्याचबरोबर गवंढीनाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण ही करण्यात आले अाहे.त्यामुळे १००एकर क्षेत्र व २० विहिरींना त्याचा फायदा होणार आहे. या वर्षी जलयुक्तच्या माध्यमातून  हे सर्वांत मोठे काम झाले आहे.या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास तलाव पुर्ण क्षमतेने भरल्यास या भागातील दुष्काळ पुर्णपणे हटण्यास मदत होणार अाहे.या बाबत माहिती देताना आमदाबादचे सरपंच योगेश थोरात यांनी सांगितले कि,  या कामातून जवळपास ५ ते ६ कोटी पाण्याचा साठा होण्यास मदत होणार असुन ग्रामस्थांना खुप फायदा  होणार अाहे.

या कामासाठी प्रशांत महामुनी, व ऋषिकेश पवार यांनी मार्गदर्शन केले अाहे .या वेळी उपसरपंच संदीप जाधव, नितीन(अण्णा) थोरात, भाऊसाहेब माशेरे, अण्णा घुले, बाबूराव माशेरे, पोपट जाधव  अादी उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या