अॅक्टीव ग्रूपकडुन शिरुर ला वृक्षारोपन

शिरूर,  ता.२१ जुन २०१६ (मुकुंद ढोबळे) :  येथील महिलांच्या अॅक्टीव् ग्रूप च्या वतीने शिरूर येथील सिद्धिचा पहाड़ येथे दोनशे विविध प्रकारची झाडे लावण्यात अाली.यावेळी विद्याधाम प्रशालेच्या मुलांना वही वाटप करण्यात आले .

याप्रसंगी अॅक्टीव ग्रूप च्या सीमा खाबीया,प्रीती पोखरना,क्रांती भंडारी,कामीनी बाफणा,सपना बोरा,बरमेचा,वनपाल बी .जी .संकपाळ,प्रा .एस .डी .सालके,वाय.बी.काकडे तसेच अॅक्टीव् ग्रूप च्या महिला सदस्य,विद्यार्थी उपस्थित होते.


यावेळी बोलताना वनक्षेत्रपाल बी .के.शेंडगे म्हणाले विविध झाडापासून आपल्याला फळे,शुध्द ऑक्सिजन,औषधि मिळत असून,मानवावर नितांत प्रेम झाडे करीत आहे परंतु मानवाने ही झाडांवर प्रेम करायला शिकायला हवे. झाडे वाढली तरच सध्याच्या वाढत्या लोकसंख्यात होणारे प्रदूषण कमी होईल.दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यासाठी मानवाने आता स्वतः झाडे लावुन ती जगवन्यासाठी प्रयत्न करावे. असे ते म्हणाले.

शिरूर येथील अॅक्टीव ग्रूप च्या महिलांनी स्वतः पुढे येऊन झाडे लावणेच नाही तर ती जगवण्याचा देखील  संकल्प केला आहे.

याप्रसंगी बोलताना अॅक्टीव् ग्रूप च्या कामीनी बाफणा म्हणाल्या कि, सध्या समाजाला शुध्द हवा,प्रदूषण मुक्त जीवन,सुंदर निसर्ग हवा असून याचा फायदा माणसाच्या जीवनाला होत आहे.यातून झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला असल्याचे सांगितले.यावेळी स्वागत प्रीति पोखरना तर आभार क्रांती भंडारी यांनी मानले .
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या