आपली माती च्या शुभमला "भरत"पुरस्काराचा सन्मान

वाघाळे,  ता.२३ जुन २०१६ (प्रतिनीधी) : खो-खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या येथील अापली माती क्रिडा प्रबोधिनीच्या शुभम थोरात ला  राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात अाले अाहे.

नुकतीच भुवनेश्वर ओडीसा या ठिकाणी २७ वी सबज्युनिअर राष्ट्रीय खो खो स्पर्धा नुकतीच पार पडली. यावेळी शुभमने महाराष्ट्राकडुन खेळताना आपल्या भककम बचावाच्या जोरावर संघाला एकहाती विजय मिळवुन दिला अाहे.विशेषत: उपांत्य फेरीत खेळताना कर्नाटक आणि अंतिम फेरीतील लढतीत शुभमने अफलातुन संरक्षण केले होते.पहील्या डावात निर्णायक २:३० मी संरक्षण केले तर दुसर्या डावात तब्बल ७ मी पैकी ५मी एकट्याने खिंड लढवली अाहे.

या विशेष खेळाची दखल घेत खो खो फेडरेशन इंडीयाने सर्वोत्तम भरत पुरस्कार देऊन नुकतेच गौरविले आले.
शुभम हा वाघाळे सारख्या छोट्या ग्रामीण भागातील खेळाडु  असुन ग्रामीण भागातील राष्ट्रीय  पुरस्कार जिंकणारा तो पहीलाच खेळाडू ठरला आहे. शुभम ला खो खो खेळाचे प्रशिक्षण आपली माती क्रीडा प्रबोधनीचे प्रशिक्षक धीरज दंडवते यांनी केले अाहे.धीरज दंडवते हे विनामुल्य बाराहीमहीने सर्वच  विद्यार्थ्यांना प्रशिक्षन देत असतात.

या यशाबद्दल शुभम व प्रशिक्षक धीरज दंडवते याचे परिसरातील ग्रामस्थांकडुन अभिनंदन होत आहे


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या