तळेगावातील चोरीप्रकरणातील चोरटा गजाअाड

तळेगाव ढमढेरे,  ता.२५ जुन २०१६ (जालिंदर अादक) :  येथे पाच महिन्यांपुर्वी झालेल्या सुंदर संकुल बिल्डिंगमधील चोरीप्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात पोलीसांना यश अाले अाहे.

या प्रकरणी गणेश उर्फ पप्पू डबन भोसले (वय २३ वर्ष रा.आलेगाव पागा) असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी कि,२१.जानेवारी रोजी तळेगावातील सुंदर संकुल बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावरील समर रावळ हे बाजारसाठी घराबाहेर गेले असता बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्याचांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती.या वेळी चोरटा सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या कॅमेऱ्यातील फोटो पोलिसांना देण्यात आले होते.या फोटोच्या आधारे गणेश उर्फ पप्पू याचे वर्णन पूर्ण मिळतेजुळते दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला. या वेळी त्याने सुंदर संकुल तळेगाव येथे चोरी केल्याचे कबुल केले.तपासादरम्यान त्याने चोरी केलेले सोन्याचा राणी हार व मणी मंगळसूञ पोलीसांनी हस्तगत केले असुन चोरी करतेवेळी वापरण्यात आलेली पल्सर मोटार सायकल देखील जप्त करण्यात आली अाहे.अारोपी ला २७ जून पर्यंत वाढीव पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले अाहे.

या प्रकरणी पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या  मार्गदर्शनाखाली पी.टी.जगदाळे,एस.बी.बंड,ए.वणवे,ए.एम.बाठे हे करीत आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या