वडगावच्या हॉटेलचालकाचा अपघातात मृत्यू

वडगाव रासाई,  ता.२६ जुन २०१६ (दिपक पवार) :   येथील हॉटेल चालकाचा नानगाव (ता.दौंड) नजिक मांगोबा माळाजवळील रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर   रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली अाहे.

सुनील शिवाजी गायकवाड असे मृत्यूमुखी पडलेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी कि, सुनील गायकवाड हे वडगाव रासाई येथून काही कामानिमित आपल्या दुचाकीवरुन मोरगाव येथे त्यांचा मुलगा किशोर गायकवाड समवेत गेले होते.दरम्यान काम आटोपून वडगाव रासाईकडे येत असताना वाटेत नानगावनजीक मांगोबा माळाजवळ दोन दुचाकीच्या धडकेत सुनील गायकवाड व किशोर गायकवाड हे पिता-पुत्र गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी केडगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते.उपचारादरम्यान सुनील गायकवाड यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. छत्रपती विद्यालयाचे कर्मचारी भरत शेलार यांचे ते मेहुणे होते.

शिरूरच्या पूर्व भागातील बहुतांश गावांमध्ये आठवडे बाजारात त्यांचा चहा विक्रीसाठी विशेष प्रसिध्द होता.त्यातुनच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. या घटनेचा पुढील तपास यवत पोलिस स्टेशन करीत आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या