इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावू : खासदार शिरोळे

कासारी,  ता.२६ जुन २०१६ (प्रा.एन.बीे.मुल्ला) :  येथील हिराबार्इ गोपाळराव गायकवाड विद्यालयास भरीव निधी देवून इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन खासदार अनिल शिरोळे यांनी दिले.

खासदार शिरोळे यांनी कासारी गाव दत्तक घेतले असून या गावात करावयाच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच त्यांनी या गावाला भेट दिली.याप्रसंगी समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ.हिराबार्इ गोपाळराव गायकवाड विद्यालयात खा.शिरोळे यांच्या हस्ते वॄक्षारोपन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

तत्पूर्वी संस्थेच्या पदाधिकारी व शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले आणि विद्यालयात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहीती दिली.विद्यालयात पाचवी ते बारावीचे वर्ग असून परीसरातील सुमारे 10 गावातील विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत आहेत.परीसराची गरज ओळखून संस्थेने  कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेबरोबरच विज्ञान शाखाही सुरू केली असून सातत्याने बारावी व दहावीची उत्कॄष्ठ निकालाची परंपरा कायम असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र ढमढेरे यांनी खासदारांना दिली.याप्रसंगी विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी मिळण्याबबतचे निवेदनही देण्यात आले.

यावेळी बोलताना खा.शिरोळे यांनी विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी सीएसआर फंडातून योग्यतो निधी उपलब्ध करून देण्याचे तसेच अन्य शालेय प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.शिक्षण क्षेत्रात विलक्षण स्पर्धा असतानाही डॉ.ढमढेरे यांनी कासारीसारख्या छोटयाशा गावात परीसरातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने शैक्षणिक संकुल उभे करून गुणवत्ता सिध्द केल्याने शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान वाखानण्यासारखे आहे असे गौरवोद्गार यावेळी बोलताना त्यांनी काढले व विद्यालयात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत शिक्षकांचेही कौतुक केले.यावेळी सिध्दार्थ शिरोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव डॉ.राजेंद्र ढमढेरे, पंचायत समीती सदस्य राजेंद्र भुजबळ, सरपंच संभाजी भुजबळ, माजी सरपंच  गुलाब सातपुते, पंढरीनाथ गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य अरूण भुजबळ, दिलीप भुजबळ, भाजपा युवा मोर्चाचे अनिल नवले, बाळासाहेब चव्हाण, हमीद पठाण, संदीप भुजबळ, रावसाहेब काळकुटे, अशोक फुलावरे, सुरेश साबळे, प्राचार्य अशोक सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

समता शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र ढमढेरे यांनी खासदार शिरोळे यांचा सत्कार केला.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या