तळेगावात र्इफ्तार पार्टीचे आयोजन

तळेगाव ढमढेरे, ता. २७ जुन २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : येथील जामा मशिदीत र्इफ्तार पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना म्हणजे रमजान या महिन्यात मुस्लिम बांधव करत असलेले उपवास म्हणजेच रोजे हे सायंकाळी सोडले जातात.यावेळी रोजे धारकांना इफ्तार पार्टी देणे पुण्याचे काम समजले जाते.हिंदु–मुस्लिम ऐक्य साधण्याच्या उद्देशाने नवनाथ कांबळे हे गेल्या 21 वर्षापासून स्वत: रमजानचे उपवास(रोजे) करतात व दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करून हाफीजी, मौलवी व रोजेधारकांचा गौरव करतात.त्याचाच एक भाग म्हणून पाच हाफीजींचा व रोजेधारकांचा पुर्ण पोशाख देउन कांबळे यांनी सत्कार केला.तसेच रोजे धारक सर्व लहान मुलांचाही त्यांनी गौरव केला व फळांचे वाटप केले.

या कार्यक्रमास उपसरपंच राकेश भुजबळ, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब ढमढेरे, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य महेश भुजबळ, गोविंद ढमढेरे, हनुमंत भुजबळ, संतोष शेलार, पोलीस उपनिरीक्षक महादेव पाटील, पोपट गायकवाड, पोलीस नार्इक अनिल जगताप, अनंता बाठे, सिताराम सातपुते, अलोकनाथ कांबळे, मुनीरभार्इ बागवान, मुनीर मोमीन, हाजी आयुब बागवान, समीर  बागवान, युसुफ बागवान, कदीर शेख, गणिभार्इ मोमीन, अजीज शेख, नबी इनामदार, शकील मोमीन, आदी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या