तळेगावातील आरोग्य केंद्रात नागरिकांची होतेय गैरसोय

तळेगाव ढमढेरे,  ता.२७ जुन २०१६ (जालिंदर अादक) : येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात नागरिकांची गैरसोय होत असताना पहावयास मिळत आहे.

तळेगाव ढमढेरे,निमगाव,विठ्ठलवाडी,टाकळी भिमा,सणसवाडी सह परिसरातील अनेक भागातून कंपनी कामगार,शेतकरी,नोकरदार,व्यावसायिक या दवाखान्याचा आधार घेण्याकरिता  सकाळी लवकरच रुग्ण तळेगाव येथील आरोग्य केंद्रात उपचार घेण्याकरिता येत असतात.परंतु कामाच्या ठिकाणी कर्मचारी हजर असूनही गेटच्या बाहेर असतात परिणामी खाजगी दवाखान्यात दाखल जावे लागते. खासगी दवाखान्यात भरमसाठ पैसे घेतले जातात म्हणून शाळेतील मुलेमुली, जेष्ठ नागरिक, उपचार घेण्यासाठी तासनतास ताटकळत आरोग्य केंद्र उघडण्याची वाट पहावी लागत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. या संदर्भात काहींनी डॉ.पी.डी.घोरपडे यांच्याबाबत तक्रारी केल्या आहेत.

शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात तेथील मिळणारी तंतोतंत सुविधेमुळे सर्व रुग्ण समाधानी आहेत. पूर्वी शिक्रापूर परिसरातील मयत हे शवविच्छेदन करण्यासाठी तळेगावला आणावे लागत असल्यामुळे कामावर ताण येत असत. आता शिक्रापूर येथेच शवविच्छेदन करण्याची सोय झाली असल्याने तळेगावातील आरोग्य केंद्रात कामाचा पहिल्यापेक्षा ताण फारसा राहिलेला नसून केवळ हलगर्जीपणा चालू असल्याने सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते याबाबत माहिती घेण्यासाठी गेले असता येथील प्राथमिक केंद्रात महिला स्टाफ जास्त असल्यामुळे कित्येक वेळा शाब्दिक चकमक झाल्याचे सांगितले जात आहे.या वेळी खोटे गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने कोणीच काही बोलत नाही.

या बाबत डॉ.पी.डी.घोरपडे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या कि, एक अर्धा तास उशीर होतो तर सर्वच ओरडतात मग ज्या वेळी जास्त कामाच्या वेळी  दोन-दोन तास सुट्टी असताना थांबावे लागते त्यावेळी आमची कोणीच बाजू घेत नाही.असे त्या या वेळी म्हणाल्या.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या