युवकांचे नेतृत्व कोणी झाकु शकत नाही-कंद

शिरूर ता.२८ जुन २०१६ (सतीश केदारी) : सध्याचे युवक हे जागृत झाले असल्याने युवकांचे नेतृत्व कोणीच झाकु शकत नाही असे मत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांनी अाज झालेल्या अाढावा बैठकित बोलताना व्यक्त केले.

आज शिरूर येथे शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक शिरूर तालुक्याचे माजी आमदार अशोक पवार यांच्या अध्यतेखाली पार पडली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शैलेश मोहीते,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, विकास लवांडे,माजी आमदार पोपटराव गावडे,काकासाहेब पलांडे,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, भिमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे,घोडगंगा कारखान्याचे संचालक सुधीर फराटे, दिलीप मोकाशी, रवीबापू काळे, महिला अाघाडीच्या  तालुकाध्यक्षा वर्षाताई शिवले, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र इंगवले,कुंडलीक शितोळे, शहराध्यक्ष रंजन झांबरे आदी मान्यवर व युवक कार्यकर्ते  उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात अाले.यानंतर युवकांनी मनोगते व्यक्त केली.शहराध्यक्ष रंजन झांबरे यांनी केलेल्या कार्याचा अाढावा थोडक्यात सांगितला.या प्रसंगी अशोक पवार, काकासाहेब पलांडे, पोपटराव गावडे, प्रदिप वळसे अादींनी विचार व्यक्त केले.दरम्यान नवीन कार्यकारीणीची निवड केलेल्या कार्यकर्त्यांना नियुक्तीपञे देण्यात अाली.

या झालेल्या बैठकीला तालुक्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.त्यामुळे अाजच्या अाढावा बैठकिला युवक मेळाव्याचे स्वरुप अाले होते.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या