प्रा.नागनाथ शिंगाडे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहिर

रांजणगाव गणपती,  ता.२९ जुन २०१६ (सतीश केदारी) : स्व. रा.बा.देव सोशल फाउंडेशन चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा.नागनाथ शिंगाडे यांना जाहिर झाला असल्याची माहितीे फाउंडेशन चे राजेंद्र देव व अॅड.मकरंद देव यांनी देिली.

शिक्षणक्षेञात गेल्या अनेक दशकांपासुन कार्य करणारे व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व जाणणारे शिक्षणतज्ज्ञ स्व.राधारमण बाळकृष्ण देव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असुन जन्मशताब्दी साजरी करण्यात येत अाहे.त्याअनुषंगाने जन्मशताब्दी वर्षाच्या कार्याचा शुभारंभ विविध शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देउन करण्यात येणार अाहे.

प्रा.नागनाथ शिंगाडे हे गेल्या २३ वर्षांपासुन ते अाजतागत शिक्षण क्षेञात अध्यापनाचे कार्य करत असुन पर्यावरण साक्षरता,लोकसंख्या शिक्षण, प्रौढ साक्षरता,स्पर्धा परिक्षा अादी उपक्रम त्यांनी वेळोवेळी राबविले अाहे.
त्याच बरोबर सकाळ वृत्तपञ समुहामध्ये ते गेली १५ वर्षे पञकार म्हणुन कार्यरत असुन त्यांनी  पञकारितेच्या माध्यमातुन विविध सामाजिक प्रश्नांसंदर्भात जनजागृती केली अाहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत शिंगाडे यांना हा पुरस्कार देण्यात येणार अाहे.
त्याच बरोबर मुखई येथील मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे यांना देखील हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती देव यांनी दिली.

रविवारी (ता.३) रोजी हा पुरस्कार समारंभ नवी पेठेतील पञकार भवन येथे होणार असुन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.प्र.ल.गावडे हे अध्यक्षस्थान भुषविणार अाहेत.कॉसमॉस बॅंकेचे चेअरमन मिलिंद काळे तसेच समाजसेवक मिलिंद भोई अादी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार अाहेत.

रांजणगाव गणपती येथे शिक्षण घेतलेल्या स्व.रा.बा देव यांचा महाराष्ट्रात गौरव झाला.त्यांचे हे कार्यपुढे चालु ठेवण्यासाठी सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात अाली असुन प्राथमिक शिक्षण, विद्यार्थी  व शिक्षक यांचेसाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात अाहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या