बँकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी- हेमचंद्र खोपडे

शिक्रापूर ,  ता.१ जुलै २०१६  (प्रतिनीधी) :  बँकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रत्येक बँकांनी आपापल्या बँक, पतसंस्था व एटीएम च्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन शिक्रापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी केले आहे.

शिक्रापूर येथील पोलीस स्टेशन च्या वतीने पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पतसंस्था व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खोपडे बोलत होते. यावेळी  रांजणगाव येथे झालेल्या एटीएम लुट तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बँकांची झालेली चोरी व लुट याबाबत माहिती देत सर्व बँकांनी बँक आणि ए टी एम सेंटर च्या दर्शनी भागात कॅमेरे बसवावेत, परवानाधारक सुरक्षारक्षक नेमावेत, सुरक्षारक्षकांची वयोमर्यादा निच्छित करावी, एटीएम मध्ये एका वेळी एकाच व्यक्ती आत मध्ये सोडवा, बँक किंवा एटीएम या ठिकाणी एखादा अनोळखी व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास पोलिसांना कळवावे, बँक किंवा एटीएम येथे पोलीस स्टेशन व पोलीस अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक लावावा, ग्राहकांना बँकेच्या नावाने येणाऱ्या फोन बाबत ग्राहकांना माहिती द्यावी, स्वतंत्र तक्रार पुस्तिका ठेवावी यांसह आदी बाबींची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व पोलीस नाईक अनिल जगताप यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली.

दरम्यान  रात्रीच्या वेळेस रात्रगस्त करणारे सर्व पोलीस व पोलीस मित्र सर्व बँक ए टी एम या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत आणि त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नोंद बुक मध्ये नोंद करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी शिक्रापूर, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भिमा यांसह आदी भागातील अनेक बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या