तळेगावातील रोडरोमिओनां अाता तरी आवरा ......

तळेगाव ढमढेरे ,  ता.४ जुलै २०१६ (जालिंदर अादक) : येथील  रस्त्यावरून धुमाकूळ करणा-या रोडरोमिओंच्या वाढत्या उपद्रवामुळे तळेगावकर ञस्त झाले असुन रोडरोमिओंना चाप बसवण्याची मागणी नागरिकांनी केली अाहे.

तळेगावातील प्रमुख रस्त्यांवर शालेय विदयार्थी दुचाकींवर बसुन मोठ्ठा हॉर्नचा आवाज करून मुद्दाम आवाजाचे प्रदूषण  किवा गाडी जोरात पळवून, कर्कशआवाज करून परिसरात दहशत निर्माण करतात.या मुळे ब-याच वेळा परिसरातील शांतता भंग होते. मागील काळात पोलिसांनी ग्रुप आयकॉन्स स्टीकर असलेल्या गाडीवर कारवाईचा बडगा करताच वातावरण शांत झाले. दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षात पदार्पण झालेले तरुणवारे सध्या सुसाट सुटत आहे. या परिसरातील विद्यार्थी  चित्रपट स्टाईलमध्ये अडकलेले भीषण वास्तव सध्या दिसत असुन सैराट होऊन गाडी चालवणे, महाविदयालय तसेच  शाळेच्या आवारात रस्त्यांनी जाता-येता कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, मुलींना पाहून जोरात गाडी पळवणे अश्या अनेक युक्त्या वापरून मुले मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. काही मुली अश्यांना भुलतात तर काही मुली यांना दाद देत नाही. येथील महाविद्यालयात  तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी,टाकळी भिमा,शिवतक्रार म्हाळुंगी,कासारी,आदि परिसरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात.

नवीन मॉडेल्सच्या बाजारात आलेल्या बुलेट, मोपेड, स्पोर्टबाईक, काहीतर चारचाकी घेऊन विद्यालयात येतात.अजूनपर्यंत छेडछाडीची तक्रार झालेली नाही परंतु वाट न पाहता कायदा सुव्यवस्थेची पायमल्ली होऊ न देता यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न सर्वसामान्य सुजान नागरिकांना पडलेला आहे.दुय्यम निबंधक कार्यलयापुढे गाडी पार्किंगव्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे  वाहतूक कोंडी जास्त होत असताना गाडी चालकाला गाडी चालवण्यासाठी खूपच कसरत करावी लागत आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे वाहतूक कोंडीला भर टाकत आहेत. यामुळे पायीचालणाऱ्या नागरिकांना,सायकलस्वार,शाळेत पायी जाणारे  विद्यार्थ्यांना नीटपणे रस्त्याने चालणे हि अवघड झाले आहे.अधुन मधुन किरकोळ अपघात होत राहतात मात्र यावर कसल्याच प्रकारची उपाय योजना झालेली दिसत नाही.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या