शिरूर तालुक्यात संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला

तळेगाव ढमढेरे ,  ता.५ जुलै २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला)  : शिरूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून खरीपाच्या पेरण्यांसाठी हा पाउस उपयुक्त असल्याने  शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.
        शिरूर तालुक्यात जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले होते.गत वर्षीच्या दुष्काळातून सावरत असतानाच पावसाने ओढ दिल्याने चालू वर्षीचा खरीप हंगाम देखील वाया जातो की काय अशी भिती शेतक-यांच्या मनात निर्माण झाल्याने बळीराजाने आभाळाकडे टक लावून वरूणराजाला साकडे घातले होते.गेल्या तीन दिवसापासून संततधार पाउस चालू आहे.

शिक्रापूर सह परीसरातील तळेगाव ढमढेरे, निमगाव म्हाळुंगी, जातेगाव ,सणसवाडी , कोरेगाव भिमा ,धानोरे ,दरेकरवाडी ,विठ्ठलवाडी ,मुखर्इ ,धामारी ,रांजणगाव गणपती ,कोंढापुरी ,टाकळी भिमा ,घोलपवाडी ,पारोडी ,दहीवडी ,न्हावरा, निर्वी, आंबळे, करडे आदी गावात पाउस अक्षरश: बरसला तर अन्य ठिकाणीही समाधानकारक पाउस झाला आहे.पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना कसरत करावी लागली.मात्र संततधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्याने पाणीटंचार्इ कमी होण्यास मदत होणाए आहे.महिण्याभराच्या प्रतिक्षेनंतर पाउस बरसल्याने बळीराजा मात्र सुखावला अाहे.

जुलै उजाडला तरी टॅंकर सुरुच...
शिरसगाव काटा,पिंपळसुटी, इनामगाव अादी भागात दुष्काळाची झळ अद्याप कायम असुन जुलै उजाडला तरी टॅंकर सुरुच अाहे.या भागात अदयाप समाधानकारक पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी अाहेत .


Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या