अांबेडकरी चळवळीसाठी संघटन अावश्यक-रमेश गायकवाड

गुनाट,  ता.१२ जुलै २०१६ (तेजस फडके) : आंबेडकरी चळवळ मोठी करायची असेल तर संघटना महत्वाची आहे. ते संघटन करण्याचे काम  राष्ट्रीय दलित पॅन्थंर च्या माध्यमातून करत आहोत अस मत राष्ट्रीय दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केले.

गुनाट येथे राष्ट्रीय दलित पॅन्थंर शाखेचे उद्घाटन राष्ट्रीय दलित पॅन्थंरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश गायकवाड, रामभाऊ झेंडे, शिरुर तालुका अध्यक्ष राजेंद्र दादाभाऊ गायकवाड, सचिव अनिल कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी गुनाटचे माजी उपसरपंच अनिल भालेराव, सोमनाथ वळू, पारनेर तालुका अध्यक्ष गोपीनाथ कांबळे,शिरूर शहर अध्यक्ष भाऊसाहेब घाडगे, बौद्धाचार्य सुनिल गायकवाड, करडे शाखा अध्यक्ष गौतम गायकवाड, बी.जे. गायकवाड, अनिल गायकवाड, आतिश गायकवाड, आप्पा गायकवाड, निर्वी शाखा उपअध्यक्ष जयराम कांबळे, सोनेसांगवी शाखाप्रमुख यादव पाडळे, अध्यक्ष आकाश पाडळे, निमगाव भोगी शाखा अध्यक्ष सुभाष पाडळे.  व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या