पञकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

शिरूर ,  ता.१२ जुलै २०१६ (प्रतिनीधी) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने शहर व परिसरातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या प्रसंगी शिरूर नगरपरीषदेचे सभागृहनेते प्रकाशभाऊ धारीवाल, नगराध्यक्षा सुवर्णाताई लोळगे, भाजपचे पदवीधरचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्रजी खांडरे, पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती रविंद्रजी ढोबळे, बांधकाम समितीचे सभापती प्रविणजी दसगुडे, नगरसेवक संतोषजी भंडारी, अबिद शेख, संतोष शितोळे, तुकाराम खोले, केशव लोखंडे, शिरूर वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड.संजय येवले, सुशांत कुटे, स्वप्नील माळवे, नवनाथ जामदार, नवनाथ जाधव,प्रशासन अधिकारी जारकड आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व झाडांचे वाटप करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष संतोष शिंदे,सचिव अर्जुन बढे,शहराध्यक्ष आप्पासाहेब ढवळे, उपाध्यक्ष शेरखान शेख, कार्याध्यक्ष भाऊसाहेब खपके तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्यासंख्येने  उपस्थित होते.

शिरुर पत्रकार संघाच्यावतीने नगर परीषद शाळा क्र. १ ते ७, माहेर संस्था, निवासी मुकबधिर विद्यालय न्हावरा फाटा, आश्रम शाळा, लोकसेवा प्राथमिक शाळा आदि शहर व परिसरातील शाळांतील गोरगरीब विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर विलक्षण आनंद यावेळी पहावयास मिळाला.

पत्रकार संघ सामाजिक,शैक्षणीक,कला,क्रिडा आदि विविध क्षेत्रात काम करून त्यांना प्रोहत्साहन देण्याचे काम अनेक वर्षांपासुन करत असल्याबद्दल पत्रकार संघाचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी करून विद्यार्थ्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या