चासकमान पाण्यासंदर्भात मंगळवारी बैठक

शिरूर ,  ता.१६ जुलै २०१६ (प्रतिनीधी) : चासकमान प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून  शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत मंगळवार (ता.१९) रोजी पालकमंञी गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहीती शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली अाहे.

नुकत्याच झालेल्या पावसाने चासकमान धरणामध्ये आज अखेर ५३.०६% टक्के इतका पाणीसाठा  झाला असून चार टिएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.अद्याप लाभक्षेञात समाधानकारक पाउस न झाल्याने शिरुर व खेड तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. शिरुर व खेड तालुक्यात अनेक ठिकाणी झालेल्या पावसांवर शेतक-यांनी  पेरण्या केल्या अाहेत  पुरता परंतु त्यानंतर माञ पाऊस लांबल्याने पिकांना पाणी देण्याची मागणी होत आहे.त्याच शिरुर तालुक्यात व अन्य ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली व खेडचे आमदार सुरेश गोरे पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या